लाखो रुपयांचे चंदन जप्त; दोन आरोपींवर गुन्हा दाखल ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, June 12, 2021

लाखो रुपयांचे चंदन जप्त; दोन आरोपींवर गुन्हा दाखल !

 लाखो रुपयांचे चंदन जप्त; दोन आरोपींवर गुन्हा दाखल !

चंदन विक्री करणार्‍यांचे आंतरराज्य टोळीशी लागेबांधे..


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः  राहुरी हद्दीतील 61 लाख रुपयांचे चंदन मध्यप्रदेश मधील बुर्‍हाणपूर येथे विक्रीसाठी नेत असताना राहुरी कारखान्यावर सापळा लावून अब्दुल मोहम्मद निसाद  वय 32 वर्षे  राहणार अंजामैल हाऊस  ता. बैदाडका. जिल्हा कासारगुड, केरळ व अब्दुल फक्रुद्दीन रहमान वय 41 वर्ष रा. अमितकला हाऊस  ता. ऐनमाकजा  जिल्हा कासारगुड  केरळ  या दोन आरोपीस ताब्यात घेऊन राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.डीवायएसपी संदीप मिटके व त्यांचे पथकाने ही कार्यवाही केली आहे. चंदन विक्री करणारी आंतरराज्य टोळी यामागे असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
डीवायएसपी संदीप मिटके यांना  गुप्त बातमीदार मार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, केरळ राज्यातील चंदन तस्कर टोळी राहुरी हद्दीतून बुर्‍हाणपूर मध्यप्रदेश येथे चोरीचे चंदन घेऊन  जाणार आहे. मिळालेल्या माहितीवरून राहुरी कारखाना येथे सापळा लावून  छापा टाकला असता अंदाजे 61 लाख रुपये किमतीचे चंदन (650 किलो चंदन प्रति किलो 9500 प्रमाणे) आणि 10 लाखाचे वाहन असा एकूण 71 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई मा. श्री. मनोज पाटील पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक मा. डॉ. दिपाली काळे, यांचे मार्गदर्शनाखाली डीवायएसपी संदीप मिटके, पीएसआय मधुकर शिंदे, पीएसआय निलेश कुमार वाघ, स. फौ.राजेंद्र आरोळे, पो.हे.कॉ.सुरेश  औटी, पो. ना.जानकीराम खेमनर, पो. कॉ. गणेश फाटक, किशोर जाधव, सुनील दिघे, राहुल नरोडे, होमगार्ड तुषार बोराडे, रमेश मकासरे आदींनी केली

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here