भिंगारची कोरोना मुक्तीकडे होणारी वाटचाल कौतुकास्पद : खा. विखे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 2, 2021

भिंगारची कोरोना मुक्तीकडे होणारी वाटचाल कौतुकास्पद : खा. विखे

 भिंगारची कोरोना मुक्तीकडे होणारी वाटचाल कौतुकास्पद : खा. विखे

भिंगार छावणी परिषदेच्या हॉस्पिटलमधील कर्मचार्‍यांचा कोविड योद्धा म्हणून सन्मान


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कोविडच्या काळात अनेकांनी आपापल्यापरीने या संकटा विरोधात लढा उभारला. या काळात सर्वस्तरातून मदत कार्य केले गेले. मी खासदार या नात्याने पहिल्या लाटे केलेल्या कामा प्रमणे दुसर्‍या लाटेतही बरचं काही करणार होतो. पण मी रेमडीसीवर इंजक्शन उपलब्ध केल्या नंतर जे काही घडले त्यामुळे माझे मन खालावले व मला थांबावे लागले. राज्य सरकारने योग्य काळजी घेतली नसल्याने मला पुढेचे मदत कार्य थांबवावे लागले. त्यामुळे या लाटेत खासदार या नात्याने म्हणवे तसं योगदान देवू शकलो नाही. पण या संकटात वैद्यकीय क्षेत्राने दिलेले योगदान खूप महान आहे. भिंगार छावणी परिषदेच्या हॉस्पिटलने कमी काळात व कमी मनुष्य बळात खूप मोठे सेवा कार्य केल्याने भिंगारची करोना मुक्ती कडे होणारी वाटचाल कौतुकास्पद आहे. याठिकाणी अद्यावत ऑक्सिजन प्लँट उभारण्यासाठी मदत करणार आहे. भविष्यात मी वैय्यक्तिक लक्ष घालून माझ्या सर्व संकल्पना राबवण्याचे आश्वासन देतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीला 7 वर्ष पूर्ण झाल्या बद्दल भिंगार भाजपच्या उपक्रमचे मी कौतुक करतो, असे प्रतिपादन खा.सुजय विखे यांनी केले.
पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या सरकारला 7 वर्ष झाल्याबद्दल भिंगार भाजपाचे अध्यक्ष वसंत राठोड यांच्या संकल्पनेतून भिंगार छावणी परिषदेच्या डॉ.बाबसाहेब आंबेडकर हॉस्पिटल मधील मुख्य आरोग्याधिकारी डॉ.गीतांजली पवार व  आरोग्यधिकारी धनंजय गुंड यांचा खा. सुजय विखे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देवून तसेच सर्व वैद्यकीय कर्मचाररिंना भेटवस्तू देवून कोविड योद्धा म्हणून विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी शहर भाजपचे जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, छावणी परिषदेचे मुख्याधिकारी विद्याधर पवार, माजी नगरसेवक सुवेन्द्र गांधी, उपाध्यक्ष शिवाजी दहींडे, युवा मोर्चा अध्यक्ष किशोर कटोरे, माजी सदस्या शुभांगी साठे आदींसह भाजपाचे पदाधिकारी व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
मुख्याधिकारी विद्याधर पवार म्हणाले, भिंगार छावणी परिषदेच्या हॉस्पिटल मधील सर्व डॉक्टर व कर्माचारींचा कोविड योद्ध म्हणून सन्मान होणे ही निस्वार्थपणे केलेल्या कामाची पावती आहे. भिंगारच्या या हॉस्पिटल मध्ये केवळ दोन डॉक्टर, सात नर्स व दोन वॉर्ड बॉय एवढ्या कमी स्टाफ असताना सुमारे दोन हजार करोना रुग्ण बरे केले आहेत. आज केवळ एकाच रुग्णावर उपचार चालू आहेत. खा.सुजय विखे यांनी या हॉस्पीटलला मदत करावी, अशी विनंती त्यांनी केली.
प्रास्ताविकात अध्यक्ष वसंत राठोड म्हणाले, आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीला सात वर्ष पूर्ण होत असल्याचा मोठा आनंद भिंगार भाजपाला झाला आहे. करोनाच्या या दुसर्‍या लाटेत आरोग्य विभागावर  सर्वात जास्त ताण पडला आहे. भिंगार मधील या हॉस्पिटलच्या सर्व डॉक्टर व नर्स यांनी अहोरात्र सेवा दिल्याने आज भिंगार शहराची वाटचाल करोना मुक्ती कडे झाली असल्याचे सांगताना मला आनंद होत आहे. मनापासून सेवा देणार्‍यांचा सन्मान झाला पाहिजे या भावनेने भिंगार भाजपने सर्वांना करोना योद्ध म्हणून सन्मान करत आहे.
कार्याक्रमचे सूत्रसंचलन नेहा मुंगी यांनी केले. किशोर कटोरे यांनी आभार मानले. यावेळी महिला आघाडी अध्यक्षा ज्योत्स्ना मुंगी, लक्ष्मिकांत तिवारी, ब्रिजेश लाड, संतोष हजारे, सुरेश तनपुरे, गणेश साठे, अनंत रासने, आनंद बोथरा, राकेश भाकरे, नीलम परदेशी व शीतल भुजबळ आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment