भाजपच्या वतीने नेवासा फाटा येथे चक्काजाम आंदोलन. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, June 25, 2021

भाजपच्या वतीने नेवासा फाटा येथे चक्काजाम आंदोलन.

 भाजपच्या वतीने नेवासा फाटा येथे चक्काजाम आंदोलन.नगरी दवंडी

नेवासा  -"ओबीसी"च्या आरक्षणासाठी भाजपच्या वतीने शनिवारी सकाळी ११ वाजता नेवासा फाटा येथे रास्तारोकोद्वारे चक्काजाम आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलनकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणा धोरणाचा निषेध केला.माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे पाटील भाजपचे तालुकाध्यक्ष नितीन दिनकर,नेवासा नगरपंचायतचे नगरसेवक सचिन नागपुरे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.

या आंदोलनामध्ये जिल्हा परिषदेचे सदस्य दत्तात्रय काळे,नामदेव खंडागळे,युवा मोर्चाचे निरंजन डहाळे, प्रदीप ढोकणे,ज्ञानेश्वर पेचे,दत्तात्रय पोटे,जिल्हा सरचिटणीस अंकुश काळे,भाऊ नगरे,भाजपचे शहराध्यक्ष मनोजभाऊ पारखे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

ओबीसींचे आरक्षण त्यांच्या हक्काचे असून ते त्यांना मिळालेच पाहिजे मात्र ओबीसींच्या आरक्षणाचा मुद्दा सरकार गांभीर्याने घेत नसल्याने महाविकास आघाडी सरकारचा तीव्र शब्दात माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, विठ्ठलराव लंघे,भाजपचे तालुकाध्यक्ष नितीन दिनकर यांनी यावेळी निषेध केला.चक्काजाम आंदोलनामुळे नगर औरंगाबाद रोडवर वाहनांची मोठी रांग लागली होती.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here