तिसरी लाट परतून लावण्यासाठी नियमांचा वापर करावा- सागर बोरुडे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, June 22, 2021

तिसरी लाट परतून लावण्यासाठी नियमांचा वापर करावा- सागर बोरुडे

 तिसरी लाट परतून लावण्यासाठी नियमांचा वापर करावा- सागर बोरुडे

आदर्श नगर महिला बचत गटातील महिलांना मास्क, सॅनिटीजरचे वाटप


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कोरोनाच्या पहिल्या व दुसर्‍या लाटेमुळे नागरिक भयभीत झाले आहेत,कोरोना विषाणू हा संसर्ग विषाणू असल्यामुळे एका व्यक्तीपासून अनेक व्यक्तींना संसर्ग होण्याची भीती मोठ्या प्रमाणात आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने दिलेल्या अटी व नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येकाने मास्क व सॅनिटीजरचा वापर करावा, यासाठी समाजामध्ये जनजागृतीची गरज आहे. येणार्‍या तिसर्‍या लाटेला परतून लावण्यासाठी शासनाने दिलेल्या नियमाचे काटेकोर पणे पालन करण्यासाठी जनजागृतीची खरी गरज आहे तिसरी लाट येऊ नये यासाठी प्रत्येकाने मास्क, सॅनिटीजर, सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे तसेच महिलांनी पुढाकार घेऊन कोरोना विषाणू ला हद्दपार करण्यासाठी लढा उभा करून नागरिकांमध्ये जनजागृती करावी असे प्रतिपादन मनपा आरोग्य समितीचे अध्यक्ष नगरसेवक डॉ.सागर बोरुडे यांनी केले.
मनपा आरोग्य समितीच्या वतीने बोल्हेगाव-नागपूर येथील आदर्श नगर महिला बचत गटातील महिलांना मास्क, सॅनिटीजरचे वाटप करण्यात आले यावेळी मनपा आरोग्य समितीचे अध्यक्ष नगरसेवक डॉ.सागर बोरुडे, कांचन इंगवळे, आशा काळे, शोभा मते, सीता पुंड, मीना आहेर, मंदा तोडमल आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here