जिल्हान्यायालय परिसरात वृक्षारोपण अभियान. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, June 5, 2021

जिल्हान्यायालय परिसरात वृक्षारोपण अभियान.

 जिल्हान्यायालय परिसरात वृक्षारोपण अभियान.

बार असोसिएशनचा 200 झाडे लावण्याचा उपक्रम.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अहमदनगर जिल्हा न्यायालयाचा भव्य इमारतीचा परिसर हिरवाईने नटविण्यासाठी अहमदनगर  बार असोसिएशनने पुढाकार घेतला असून, न्यायालयाच्या आवारात दोनशे झाडे लावण्याच्या अभियानाचा प्रारंभ जागतिक पर्यावरण दिनी वृक्षरोपणाने करण्यात आला. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांच्या मार्गदर्शन व परवानगी नूसार जिल्हा न्यायालयातील वकिलांचे वाहन तळ येथे नियोजनबध्द पध्दतीने दोनशे झाडे लावण्यात येत आहे. येथील प्रत्येक झाडांना नंबर दिला जाणार असून, प्रत्येक वकिल एक झाड दत्तक घेऊन त्याचे संगोपण करणार आहे. जिल्हा न्यायालय हिरवाईने बहरण्यासाठी बार असोसिएशनने पुढाकार घेतला आहे.
बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. भूषण बर्हाटे म्हणाले की, वकिल आपल्या मुलांप्रमाणे या वृक्षांचे संगोपण करणार आहेत. कोरोनाच्या संकटकाळात ऑक्सिजनचे महत्त्व सर्वांना समजले. आजही ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. यासाठी  जिल्हा न्यायालयाच्या आवारात ऑक्सिजन देणारी देशी झाडे लावण्यात आली आहे. उपाध्यक्ष अ‍ॅड. सुहास टोणे यांनी नगरचे न्यायालय निसर्गरम्य होणार असून सर्वांना त्याचा लाभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले. अ‍ॅड. सुरेश लगड यांनी या उपक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन साधले जाणार असून, पर्यावरणाचा जागतिक प्रश्न निर्माण झाला असताना सर्वांनी या चळवळीत योगदान देण्याचे त्यांनी आवाहन केले. अ‍ॅड. समीर पटेल यांनी कोरोनात मृत्यू झालेल्या वकिल बांधवांच्या स्मृती देखील या वृक्षांच्या माध्यमातून जपण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. अ‍ॅड. अभय राजे म्हणाले की, आयुष्यात देशाचे, आई-वडिलांचे व समाजाचे हे तीन ऋण फेडायचे असतात. त्याशिवाय मोक्ष प्राप्ती होत नाही. यापैकी समाजाचे ऋण फेडण्यासाठी वृक्षरोपण हा सर्वोत्तम मार्ग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोरोनाच्या नियमांचे पालन करुन हा कार्यक्रम घेण्यात आला. अ‍ॅड. राजेश कावरे यांनी आभार मानले.
यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. भूषण बर्हाटे, उपाध्यक्ष अ‍ॅड. सुहास टोणे, अ‍ॅड. राजेश कावरे, अ‍ॅड. समीर पटेल, अ‍ॅड. सुरेश लगड, अ‍ॅड. रमेश वाकळे, अ‍ॅड.सतीशचंद्र सुद्रिक, अ‍ॅड. अभय राजे, अ‍ॅड. जय भोसले, अ‍ॅड. योगेश नेमाणे, बाळासाहेब खोमणे सर, अ‍ॅड. सारस क्षेत्रे, अ‍ॅड. सिध्दांद शिंदे, अ‍ॅड. सतीश चौधरी, अ‍ॅड. गणेश आरे, अ‍ॅड. हनिफ शेख, अ‍ॅड. काकासाहेब कोठुळे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here