मराठी पत्रकार परिषदेच्या जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी अमोल वैद्य यांची नियुक्ती - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, June 15, 2021

मराठी पत्रकार परिषदेच्या जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी अमोल वैद्य यांची नियुक्ती

 मराठी पत्रकार परिषदेच्या जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी अमोल वैद्य यांची नियुक्ती


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या अहमदनगर जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी अकोले तालुक्यातील जेष्ठ पत्रकार अमोल वैद्य यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख, विश्वस्त किरण नाइक, अध्यक्ष गजानन नाइक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, सरचिटणीस संजीव देशमुख तसेच परिषदेचे उपाध्यक्ष यशवंत पवार, नाशिक विभागीय सचिव मन्सूरभाई शेख व अहमदनगर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा यांनी केलेल्या शिफारशीनुसार ही नियुक्ती जाहिर करण्यात आली.
अमोल वैद्य हे गेल्या 23 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. विविध वर्तमानपत्रात त्यांनी काम पाहिले आहे. सध्या ते दैनिक सार्वमतचे उपसंपादक म्हणून काम पहात आहेत. अकोले तालुका पत्रकार संघाचे ते माजी अध्यक्ष व सचिव राहिले आहेत. रोटरी क्लब अकोलेचे त्यांनी संस्थापक अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. याशिवाय अनेक सामाजिक संघटनेत त्यांचा सक्रिय सहभाग असतो. सुगाव ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. महात्मा गांधी तंटामुक्त समिती  सुगाव खुर्दचेते अध्यक्ष व अकोले महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाचे सचिव म्हणून ते काम पहात आहेत. अखिल भारतीय मराठी पत्रकार परीषदेच्या वतीने विविध उपक्रम राबविन्यात येत असतात. पत्रकारांच्या प्रश्नी आंदोलने केली जातात. या कामाला व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्ह्यात प्रसिध्दी प्रमुख नियुक्त करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या ऑनलाइन सभेत घेण्यात आला होता. त्यानुसार नाशिक विभागाच्या नियुक्त्या परिषदेच्या वतीने आज घोषित करण्यात आल्या. ही नियुक्ती एक वर्षांसाठी असनार आहे. याबद्दल अमोल वैद्य यांचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here