आडते बाजार, दाळमंडई बाजारपेठ प्रशासनाच्यावतीने खुली - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 2, 2021

आडते बाजार, दाळमंडई बाजारपेठ प्रशासनाच्यावतीने खुली

 आडते बाजार, दाळमंडई बाजारपेठ प्रशासनाच्यावतीने खुली

काँग्रेसच्या प्रयत्नांना यश


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कोरोनाची लाट ओसरत आहे. नगर शहरातील आडते बाजार, दाल मंडई बाजारपेठ गेल्या अनेक दिवसांपासून पूर्णतः बंद आहे. ही बाजारपेठ सुरू करण्याच्या दृष्टीने मागील तीन-चार दिवसांपासून व्यापारी आणि काँग्रेस यांच्यामध्ये सातत्याने संवाद सुरू होता. काँग्रेसच्या वतीने महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांना या संदर्भामध्ये व्यापार्‍यांना न्याय मिळावा यासाठी शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी साकडे घातले होते. अखेर जिल्हा प्रशासनाने काल रात्री उशिरा बाजारपेठ खुली करण्याचा आदेश काढून व्यापार्‍यांना त्यांची दुकाने उघडी करण्यासाठी परवानगी दिली आहे.

काल रात्री उशिरा जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, मनपा आयुक्त शंकर गोरे यांनी बाजारपेठेमध्ये स्वतः भेट देत व्यापार्‍यांशी चर्चा केली. यावेळी आडते बाजार असोसिएशन पदाधिकार्‍यांनी प्रशासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करण्यात येईल याबाबत लेखी ग्वाही जिल्हा प्रशासनाला दिली आहे. आजपासून दररोज सकाळी सात ते अकरा या वेळेमध्ये दुकानांना उघडण्यासाठी परवानगी असणार आहे.
काल दुपारी साडेतीन वाजता काँग्रेसच्या शिष्टमंडळाने किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, शहर जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे, विद्यार्थी काँग्रेस प्रभारी अनिस चुडीवाला, क्रीडा काँग्रेस अध्यक्ष प्रवीणभैय्या गीते पाटील यांच्यासह जिल्हाधिकार्यांची भेट घेत व्यापार्‍यांच्या प्रश्नावर सुमारे अर्धा तास चर्चा केली होती.
यावेळी व्यापार्‍यांच्या व्यथा काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकार्यां समोर मांडण्यात आल्या. राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी या बैठकीपूर्वी किरण काळे यांनी दूरध्वनीवरून चर्चा करत त्यांना सविस्तर माहिती देत व्यापार्‍यांचे म्हणणे त्यांच्यासमोर मांडले होते.
ना. थोरात यांनी यानंतर जिल्हाधिकारी यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधत व्यापार्‍यांच्या प्रश्नांवर तातडीने बैठक घेऊन त्या बाबतीमध्ये सकारात्मक चर्चा करत व्यापार्‍यांना न्याय देण्याच्या दृष्टीने प्रशासनाने भूमिका घ्यावी अशा सूचना दिल्या होत्या.
दुपारी साडेचार वाजता जिल्हाधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाशी निगडित सर्व संबंधित अधिकार्‍यांची बैठक या संदर्भामध्ये पार पडली. या बैठकीमध्ये विविध बाबींवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी स्वतः बाजारपेठेमध्ये भेट देत व्यापार्‍यांशी संवाद साधला.
रात्री उशिरा पुन्हा किरण काळे यांनी ना.बाळासाहेब थोरात यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधत पाठपुरावा केला. अखेर काँग्रेसच्या प्रयत्नांना यश आले. जिल्हाधिकार्‍यांनी रात्री उशिरा याबाबतचा आदेश काढत व्यापार्‍यांना दुकाने खुली करण्याची परवानगी दिली आहेत. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने केलेल्या पाठपुराव्यामुळेच आडते बाजार, दाल मंडई मधील व्यापारी बांधवांसाठीच्या मागणीला यश आल्याचा दावा ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष मनोज गुंदेचा यांनी केला आहे. ना.बाळासाहेब थोरात, किरण काळे, जिल्हा प्रशासन यांचे आम्ही आभारी आहोत, असे गुंदेचा यांनी म्हटले आहे.
व्यापारी बांधवांनी त्यांना प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करत प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन शहर जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे, विद्यार्थी काँग्रेसचे प्रभारी अनिस चुडीवाला, क्रीडा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीणभैय्या गीते पाटील आदींनी व्यापार्‍यांना केले आहे..

No comments:

Post a Comment