प्रगती की अधोगती? - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, June 5, 2021

प्रगती की अधोगती?

 प्रगती की अधोगती?

(जागतिक पर्यावरण दिन विशेष लेख)


71 वर्षांनी भारतात दाखल होणार चित्ता’ या बातमीने माझे लक्ष वेधून घेतले. 2020 या वर्षी जैवविविधता ही थीम घेऊन सार्‍या जगभर पर्यावरण दिन साजरा झाला होता. त्याची आठवण झाली. खरच काय प्रयत्न झाले असतील जैवविविधता टि कवण्यासाठी? वाढवण्यासाठी? चि त्ता हा 3 सेकंदात ताशी 103 कि लोमीटर सुसाट वेगाने पळणारा दुर्मि ळ जातीचा प्राणी आहे, पण 1947 आली मात्र भारतात तो लोप पावला. आगामी नोव्हेंबर महि न्यात पुन्हा त्याला भारतात (दक्षि ण आफ्रि के तून) आणले जाणार आहे. असे कि तीतरी प्राणी, पक्षी, छोटे जीव इतके च काय तर वनस्पती देखील माणसांच्या हव्यासापायी लोप पावत गेल्या. पर्या वरण र्‍हासासाठी के वळ प्रदूषणच कारणीभूत नाही तर पर्यावरणाचा झालेला र्‍हास देखील कारणीभूत आहे. पर्या वरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक जीव महत्वाचा असतो. मग ती मुंगी असो, चिमणी असो किंवा चित्ता. 22 मे हा दिवस ’जागतिक जैवविविधता दिन’ म्हणून साजरा केला जातो.

’जगा आणि जगू द्या’ या संतवाणीनुसार आपण खरेच कधी वागलो का? 2020 हे वर्ष जैववि वि धतेचे संवर्धन ही थीम घेऊन जागति क पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. पण त्याचे यशापयश मात्र गुलदस्त्यातच आहे. मानवाने स्वतःच्या स्वार्थापायी कितीतरी प्राण्यांच्या, वनसंपत्तीच्या कत्तली के ल्या, की आज या वसुंधरेचा, पर्यावरणाचा समतोल राखणारे प्राणी, कि तीतरी वनस्पती अस्तंगत झाल्या आहेत. जंगले, जंगलातील काही प्राणी, वनस्पती प्रजाती अगदी नामशेष होण्याच्या मार्गावर लागले आहेत. निसर्गाने निर्मिलेली प्रत्येक गोष्ट ही पर्यावरण संतुलनाचा महत्त्वाचा घटक आहे, पण आम्हाला सुटलेली हाव कधी संपलीच नाही आणि पर्यावरणाचा समतोल बिघडेपर्यंत हव्यास वाढतच राहिला. हत्तीपासून तर छोट्या फुलपाखरापर्यंत, छोट्या वनस्पतीपासून ते मोठ्या वृक्षांपर्यंत सारे राजरोसपणे आपले समजून कत्तली सुरू राहिल्या. जागतिक पर्यावरण दिनाच्या वेबसाईटवर लिहिलेला संदेश आहे, आपण खातो ते अन्न, श्वास घेतो ती हवा, पितो ते पाणी आणि हवामान या सगळ्या गोष्टींमुळे आपण या ग्रहावर राहू शकतो. या सगळ्या गोष्टी निसर्ग आपल्याला देतो. सध्याच्या या अभूतपूर्व परिस्थितीमध्ये निसर्ग आपल्याला एक संदेश देतोय. स्वतःची काळजी घेण्यासाठी आपण निसर्गाची काळजी घेणे गरजेचे आहे.
खरेतर कोणत्याही देशाचा वि कास करायचा असेल तर तो पर्या वरणस्नेही वि कास कामे करूनच करता येणार आहे. भारताने 2005 ते 2030 या कालावधीत कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण एकू ण उत्सर्जनाच्या 33 ते 35 टक्के कमी करण्याचे लक्ष्य निश्चित के ले आहे. वर्ष 2009 पासून कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करण्याचा जागति क स्तरावर विविध देशांनी निर्धारकेलेला असतांना देखील अजून पावेतो त्यात यश आलेले नाही. ध्वनी प्रदूषण, गजबजलेली शहरे, कारखाने, घरातील इलेक्ट्रॉनि क वस्तूंचे आवाज केवढे मोठे ध्वनि प्रदूषण वाढलेले आहे. मर्या देपलीकडे असह्य ध्वनी म्हणजे ध्वनिप्रदूषण. त्यामुळे चिडचिड वाढते, रक्तदाब वाढतो, डोकेदुखी सुरु होते. कि त्येकदा म्हातार्‍या लोकांना हार्टअटॅक सारखा त्रास उद्भवतो. कर्णदोष, बहिरेपणा येण्याचा संभव असतो. प्रदूषणाचा सर्वात जास्त घातक परिणाम लहान मुलांवर होत असतो. आजची सर्वा त मोठी आणि संपूर्ण जगाला भेडसावणारी समस्या म्हणजे कचरा समस्या होय. प्लास्टिकचा वापर ही गोष्ट कचरा वाढीसाठी कारणीभूत ठरली आहे. जिकडे तिकडे प्लास्टिकच्या पिशव्या फेकलेल्या दिसतात. मला आठवते, की लहानपणी बाहेर जातांना सोबत कापडी पि शवी घेऊनच नि घायचो. पण आता हातात कॅरीबॅग किंवा पॉलिथिन हेच पहायला मिळते. सरकारने प्लास्टि क बंदी आणलेली आहे, पण प्लास्टिकचा वापर मात्र सर्रास होताना दिसून येतो. या प्लास्टि कचे वि घटन होण्यासाठी शंभर ते दोनशे वर्षे लागतात. बरेचदा जनावरे प्लास्टि क गि ळतात आणि त्यामुळे त्यांचा करुण अंत होतो. आपला हलगर्जीपणा बिचार्‍या मुक्या जनावरांना सोसावा लागतो. केवळ प्रशासनाला दोष न देता स्वतःही त्या दृष्टीने पावले उचलावी लागेल. तेव्हाच आपल्या
भारताचे ’स्वच्छ भारत, सुंदर भारत’ स्वप्न पूर्ण होईल. कोणतीही समस्या सोडविण्यासाठी तंत्रज्ञान आणि नि योजन या दोन्हीची गरज आहे. सोबतच लोकसहभाग व कायद्याचा धाक याशि वाय ही गंभीर समस्या सुटत नाही. 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टि क वापरण्यावर बंदी घालण्याचे पाऊल सर्वा त प्रथम महाराष्ट्रात उचलले आहे. डि सेंबर 2017 मध्ये संपूर्ण प्लास्टि क बंदी चे सूतोवाच केले आणि दोन मार्च 2018 ला प्लास्टि क बंदीचा अध्यादेश लागू के ला. घनकचरा, आण्विक कचरा, ई-कचरा, वैद्यकीय कचरा आणि आता त्यात भरीस भर म्हणून कारोना काळात दररोज शेकडो किलो कचरा भर घालीत आहे. राज्य प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या आकडेवारीनुसार र्लेींळव-19 पूर्वी राज्यात प्रति दि न 62.3 टन (62300 कि लो ग्रॅम) जैविक कचरा तयार व्हायचा, तर कोरोना काळात जैवि क कचर् याची संख्या 90.6 टन (90 600 कि लो ग्रॅम) वर पोहोचली आहे. वि कसि त देशांच्या तुलनेत भारतातील दरडोई प्लास्टि क वापर कमी आहे, परंतु दुर्लक्षणीय मात्र नक्कीच नाही. शेवटी प्रश्न अनुत्तरि तच राहतो, की 2018 पासून प्रयत्न करूनही आजही प्लास्टि क समस्या कि तपत सोडू शकलो आहे? नि सर्गा ने नि र्मि लेली ही सुजलाम-सुफलाम धरा आपण कधी बकाल करून टाकली कळलेच नाही? प्लास्टि कमुक्त पृथ्वी बनवि ण्यासाठी काही चांगले पर्या य नि घणे गरजेचे आहे. जे आज सुकर कि ं वा सहज नसतील पण भविष्य मात्र चांगले व पर्या वरणस्नेही असेल. तौक्ते चक्रीवादळाने केलेली हानी म्हणजे सृष्टीच्या कार्या त अडथळे आणण्याचा दुष्परिणामच आहे. कारण ग्लोबल वार्मिंग आणि सततची समुद्र, महासागर वार्मिं ग यामुळे तौक्ते सारखे भयंकर चक्रीवादळ तयार होतात, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. अरबी समुद्रातील पृष्ठभागावरील सतत वाढते तापमान काही दशकांपासून त्यामुळे ग्लोबल वार्मिंग कमी केले तरच भविष्यातील चक्रीवादळासारख्या नैसर्गि क आपत्तींना रोखणे शक्य होईल. महात्मा गांधीजींनी म्हटले होते, ढहश एरीींह ळी र्ीीषषळलळशपीं ीें ीरींळीषू र्शींशीूेपश’ी पशशव र्लीीं पेीं ींहश सीशशव. या वसुंधरेवर तुमच्या जगण्यासाठी लागणारी प्रत्येक गोष्ट आहे. हवा, पाणी, अन्न परंतु तुमचा प्रगतीचा हव्यास हा अधोगतीकडे जाणारा मार्ग आहे. भरमसाठ वाढलेल्या लोकसंख्येमुळे जंगलतोड, वाहनांची भरमसाठ वाढ, वाढता कचरा, यामुळे मानव आज पुरता पर्या वरणीय असंतुलनाच्याघेर्‍यात सापडलाय. यावर ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे अन्यथा नि सर्गा चा प्रकोप आपले कार्य करणारच. एकीकडे जग कोरोनाच्या नव्या नव्या व्हेरि यंट्सोबत दोन हात करण्यात व्यग्र असताना जगभरात नैसर्गिक आपत्तीची संख्याही कमालीची वाढली आहे. मागील दहा वर्षां त संपुर्ण जगामध्ये कोरडा दुष्काळ, महापूर, चक्रीवादळे, ढगफुटी, हिमस्खलन, भूस्खलन, जंगलांना आग लागणे इ. नैसर्गीक दुर्घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. वि कास हे गोंडस नाव देवून निसर्गाची अपरिमित हानी केली आणि आज त्याचीच फळे भोगावी लागत आहेत.
पर्यावरण बचावाचा के वळ उदोउदो करून होणार नाही, तर त्यासाठी स्वतःपासूनच सुरुवात करावी लागेल. पर्यावरणाला आजची तरुणाईच वाचवू शकते. जोपर्यंत लोकसहभाग मि ळत नाही तोवर कोणत्याही देशातील समस्या सुटणे नाही. याची सुरुवात स्वतःपासून करूया. गरज नसतांना घरातील टीव्ही, वाशिगं मशीन, एसी, लाईट, फॅन इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर थांबवूया. एक पाऊल पुढे टाकत एखाद्या पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाचे कार्य करणार्‍या एखाद्या स्वयंसेवी संस्थेचा घटक होऊया. पर्यावरण वाचवि ण्यासाठी वि वि ध मोहि मा राबवत जनजागृती करूया. पाण्याचे महत्त्व समजून घेऊन जलसाक्षरता वाढविणे. पर्यावरण शिक्षण हा विषय औपचारिक व अनौपचारिकरित्या शिक्षणात समाविष्ट केला जावा. सरोवरांचे संरक्षण व संवर्धन तसेच नद्यांचे शुद्धीकरण करणे, वन्यजीवांचे संरक्षण व वि कास याचे महत्त्व पटवि ण्यासाठी (जनसामान्यांसाठी) विविध चर्चा सत्रे आयोजित करणे, प्रदूषण या संदर्भा त केंद्र व राज्य शासनाने संमत केलेले अधिनियम व नियमावलीचे काटेकोर पालन करणे, इत्यादी उपायोजना केल्या तरच आपण पर्यावरण समृद्धीच्या दिशेने वाटचाल करू यात शंकाच नाही. जगण्याचा अर्थ कळला ना आम्हा भाकरी मागे धावत राहिलो. सौंदर्याचे, सुंदरतेचे लचके तोडून प्रगतीचे गोडवे गात राहिलो.
योगिता जिरापुरे मो. 9766965516
धारणी, अमरावती.
(शिक्षिका)

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here