शिक्षण संस्थांनी शुल्क कमी करण्याची मागणी ः गजानन भांडवलकर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, June 5, 2021

शिक्षण संस्थांनी शुल्क कमी करण्याची मागणी ः गजानन भांडवलकर

 शिक्षण संस्थांनी शुल्क कमी करण्याची मागणी ः गजानन भांडवलकर

शैक्षणिक संस्थांच्या शिक्षण शुल्काबाबत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शिक्षणाधिकार्‍यांना निवेदन.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कोरोणा महामारी च्या पार्श्वभूमीवर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क भरणे अवघड झाले आहे शैक्षणिक संस्था मात्र कोणत्याही प्रकारची तडजोड करायला तयार नाही त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षण संस्थांनी शुल्क कमी करण्याची मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने शिक्षणाधिकारी शिवाजी शिंदे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी जिल्हा अध्यक्ष गजानन भांडवलकर समवेत नगर श्रीगोंदा विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष दादा दरेकर, निलेश बांगरे, जिल्हा कार्याध्यक्ष विशाल म्हस्के, तालुका अध्यक्ष शहबाज शेख, जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद कर्नावट, वैभव म्हस्के, युवराज सुपेकर आदी उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयाने निर्देश देऊनही शिक्षण संस्था आपल्या शुलका मध्ये एक रुपयाही कमी करण्यास तयार नाही ज्या सुविधा गेल्या वर्षभर वापरले नाहीत या सुविधांचे पण शुल्क आकारण्यात आलेले आहे. संकटाच्या काळामध्ये शिक्षणासारख्या पवित्र व्यवसायामध्ये सुद्धा संस्था आपला नफा सोडायला तयार नाही शिक्षण संस्थांच्या आडमुठेपणा च्या धोरणाच्या विरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस च्या वतीने निवेदन देण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे मान ठेवत सर्व शिक्षण संस्थांनी आपल्या शिक्षण शुल्कात सरसकट कपात करून जे विद्यार्थी सुविधा वापरत नाहीत त्यांचे शुल्क आकारू नये शिक्षण शुल्क समितीने लवकरात लवकर राज्यातील सर्व शिक्षण संस्थांच्या शुल्क निश्चितीचे पुन्हा प्रक्रिया करून नवीन शुल्क निश्चित करावेत तोपर्यंत कोणत्याही पालकांकडून शिक्षण संस्थांना शुल्क आकारण्याचा हक्क नाही असा आदेश काढावा केंद्र सरकारने आणि रिझर्व बँक ऑफ इंडियाने सर्व बँकांना 0% व्याजाने शैक्षणिक कर्ज योजना लागू करण्याचे निर्देश द्यावेत नर्सरी ते 10 वीचे शिक्षण देणार्‍या शिक्षण संस्थांनी शैक्षणिक साहित्य शाळेतूनच द्यावे तसेच सर्व बोर्डांनी निर्देशित केलेले पुस्तके शिकवताना वापरावीत. मागील वर्षाचे थकित शुल्क असेल तर त्या विद्यार्थ्यांना परीक्षा व शिक्षणापासून वंचित ठेवू नये. तसेच शाळा महाविद्यालय सोडण्यास भाग पाडू नये विद्यार्थी आज ना उद्या आपले पैसे देणार आहे तोपर्यंत त्याची महत्त्वाची कागदपत्रे आपल्याकडेच राहणार आहे.  वरील सर्व मुद्द्यांचा आपण सकारात्मक विचार करून योग्य प्रतिसाद द्यावा अन्यथा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने विद्यार्थ्यांच्या हितासाठी आपल्या विरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल.

No comments:

Post a Comment