विकास कामाची आश्वासनाची वचनपुर्ती सुरू - आ. संग्राम जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 22, 2021

विकास कामाची आश्वासनाची वचनपुर्ती सुरू - आ. संग्राम जगताप

 विकास कामाची आश्वासनाची वचनपुर्ती सुरू - आ. संग्राम जगताप

कानडे मळ्यातील क्राक्रीटीकरण रस्त्याची कामे मार्गी


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शहरामध्ये मुलभूत प्रश्नापासून विकासाचे प्रश्न मार्गी लागले आहेत. त्यामुळेच विकास कामातून नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे. गेल्या 7 वर्षामध्ये नगर शहरातील विविध प्रश्न मार्गी लागण्यासाठी मा.शासनाकडे पाठपुरावा केल्या विविध विकास कामासाठी निधी प्राप्त झाला आहे. यामध्ये नाटयसंकुल, बाळासाहेब देशपांडे हॉस्पीटल सह शहरातील विविध डीपी रस्त्यासाठी निधी मिळाला आहे. सीएसआरडी, एमएसईबी, कानडे मळा रोड ते सोलापूरला जोडणारा डीपी रस्त्यासाठी सरकारकडून 3 कोटी निधी प्राप्त झाला आहे. या विकास कामामुळे शहर विकासाला चालना मिळाली आहे. स्थायी समितीचे सभापती मा.श्री.अविनाश घुले यांनी विकास कामासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश येवून कानडे मळा परिसरातील विविध प्रश्न मार्गी लागले आहेत. या डिपी रस्त्यामुळे या भागाच्या विकासाला गती मिळाली आहे. नागरिकांना दिलेल्या विकास कामाच्या आश्वासनाची वचनपुर्ती सुरू आहे. असे प्रतिपादन मा.आ.श्री.संग्रामभैय्या जगताप यांनी केले आहे.
स्थायी समितीचे सभापती मा.श्री.अविनाश घुले यांच्या प्रयत्नातून कानडे मळा परिसरातील रस्ता कॉक्रीटीकरण कामाचा शुभारंभ मा.आ.श्री.संग्रामभैय्या जगताप यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी मा.स्थायी समितीचे सभापती मा.श्री.सचिन जाधव, ज्येष्ठ नेते मा.श्री.उबेद शेख ,मा.श्री.रामदास कानडे, मा.श्री.मिलींद कानडे, मा.श्री.अतुल कानडे, मा.श्री. गणेश भदर, मा.श्री.ऋषिकेश हजारे, मा.श्री.नितीन बोरूडे, मा.श्री.दुर्गेश सानप, मा.श्री.रविंद्र कानडे, मा.श्री.तुकाराम गिते, मा.श्री.कैलाश कवडे, मा.श्री.मयुर राऊत आदीसह नागरिक उपस्थित होते.
स्थायी समितीचे सभापती मा.श्री.अविनाश घुले प्रभाग 11 च्या सर्वागिन विकासासाठी कटीबध्द आहे. मा.आ.श्री.संग्राम जगताप यांच्यामुळेच प्रभागातील विकास कामासाठी मोठा निधी प्राप्त झाला आहे. कानडे मळयातील अनेक वर्षाच्या रस्त्यांची प्रश्न मार्गी लागली आहेत.प्रभागातील एकाएका भागासाठी निधी प्राप्त करून नियोजन बध्द विकास कामे सुरू आहेत. ही कामे पुन्हा पुन्हा करण्याची गरज भासणार नाही. मा.आ.श्री.संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली शहर विकासाचे प्रश्न आम्ही मार्गी लावत आहोत असे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment