शब्दगंध नवोदितांचा प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशित करणार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, June 1, 2021

शब्दगंध नवोदितांचा प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशित करणार

 शब्दगंध नवोदितांचा प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशित करणार

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या एकत्र येणे शक्य नसल्याने नवोदितांच्या अभिव्यक्तीला वाव देण्याच्या उद्देशाने नवोदितांसाठी प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात येणार असून त्यासाठी सकारात्मक विचारांच्याच कविता पाठवाव्यात  असे आवाहन शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी केले आहे. प्रातिनिधिक काव्यसंग्रहामध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या स्वरचित दोन कविता,परिचय, फोटो,कविता स्वतःच्या असल्याचे साधे प्रतिज्ञापत्र पाठवावे,सकारात्मक विचारांच्याच कवितांची प्रातिनिधिक काव्यसंग्रहासाठी निवड केली जाईल,काव्यसंग्रह प्रसिद्ध होताच सहभागी कवींना 5 प्रती घरपोच पाठविण्यात येतील.आपले साहित्य दि.15 जून 2021 पर्यंत पोहचेल या बेताने पाठवावे.कविता व साहित्य व्हाट्सएप, ईमेल, पोस्टाने,कुरिअर ने पाठवता येईल,शब्दगंध च्या वतीने आजपर्यंत 14 प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रसिध्द झालेले असून कविता शब्दगंध, फुलोरा, लक्ष्मी कॉलनी, भिस्तबाग महालाजवळ, सावेडी, अहमदनगर येथे पाठवाव्यात.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here