यशवंत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका हेमलता कडलग सेवानिवृत्त - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 2, 2021

यशवंत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका हेमलता कडलग सेवानिवृत्त

 यशवंत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका हेमलता कडलग सेवानिवृत्त

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः फकिरवाडा (मुकुंदनगर) येथील यशवंतराव गाडे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका हेमलता सुभाष कडलग व शिक्षिका लिलावती वाघ या 27 वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर निवृत्त झाल्या. उत्तम महिला प्रशासक म्हणुन कडलग यांचा जिल्हाभर लौकीक होता. संस्थेचे खजिनदार संजय गाडे, उपाध्यक्ष मल्हारी कचरे, संचालक रामचंद्र दिघे, युवा उद्योजक अमोल गाडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत गाडे, सचिव प्रा. शशिकांत गाडे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ. सुभाष कडलग, गणेश बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका अंजली निक्रड उपस्थित होते. कोविडच्या सर्व नियमांचे पालन करीत कडलग व वाघ यांना संस्थेच्या वतीने निरोप देण्यात आला. प्रास्ताविक नवे मुख्याध्यापक बाळासाहेब गाडेकर यांनी तर आभार आदिनाथ लवांडे यांनी मानले.

No comments:

Post a Comment