दुकाने रोज सकाळी ९ते सायंकाळी ६ पर्यतच चालू राहणार, शनिवार जनता कर्फ्यू कायम.... समस्त व्यापारी असोसिएशन चा निर्णय. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, June 11, 2021

दुकाने रोज सकाळी ९ते सायंकाळी ६ पर्यतच चालू राहणार, शनिवार जनता कर्फ्यू कायम.... समस्त व्यापारी असोसिएशन चा निर्णय.

 दुकाने रोज सकाळी ९ते  सायंकाळी ६ पर्यतच चालू राहणार, शनिवार जनता कर्फ्यू कायम.... समस्त व्यापारी असोसिएशन चा निर्णय.नगरी दवंडी

जामखेड - जामखेड तहसील आणि नगरपरिषद प्रशासनाने आज रोजी जामखेड तहसील येथे सर्व व्यापारी वर्गाची मोटिंग बोलावुन जनता कर्फु बाबत निर्णय घेण्यासाठी चर्चा करण्यात आली, यामध्ये सर्वानुमते, शहराच्या आरोग्याच्या दृष्टीने, काही निर्णय घेण्यात आले,  ३ऱ्या लाटेची पूर्वतयारी म्हणून, दि.११/६/२०२१ पाहुनी सकाळी ९ ते रात्री ६ वाजेपर्यत शहरातील व्यापारी आपले दुकाने चालू ठेवतील असा निर्णय घेण्यात आला आहे.

यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते, संजय कोठारी म्हणाले आता व्यापारी खूप अडचणीत आलेले आहेत, शेतकरी अडचणीत आले आहेत त्यामुळे सर्वांच्या विचाराने निर्णय घ्यावा, व्यापाऱ्यांना दुकान चे भाडे ,नोकरांचा पगार ,लाईट बिल आणि ज्यांनी कर्ज घेतले त्याचे व्याज हे भरण्याची ताकद राहिलेली नाही, त्यामुळे सर्वांच्या मते निर्णय घेऊन प्रशासनाने सहकार्य करावे, यामध्ये मेडिकल दूध आणि बेकरी हे रोज प्रमाणे चालू राहतील तसेच ठरल्याप्रमाणे सहानंतर कोणीही दुकान उघडे ठेवून माल देऊ नये, अन्यथा त्या-त्या असोसिएशनला प्रशासन नोटीस देईल असे यामध्ये ठरले आहे यावेळी बोलताना,मोबाईल असोशिएशन चे  सुनील जगताप म्हणाले शेतकरी वर्गाला सहकार्य करा, उदया चा  शनिवार बंद चा निर्णय शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहचने अवघड आहे, तर उद्याच्या दिवस एखादा शेतकरी भाजी घेऊन आला तर त्याला कारवाई करू नये. प्रशासनाकडून याला  सहमती दर्शवली गेली आहे..

परंतु जनतेनेही हे नियम पाळावे अशी विनंती व्यापारी वर्गा कडून करण्यात आली आहे..या बंद  बाबत निर्णय हा सर्वानुमते घेण्यात आला आहे, प्रशासनाचा कसलाही बंद बाबत, लॉकडवून नसणार आहे, हा निर्णय स्वयंस्फूर्तीने आहे..

या वेळी उपस्थिय, मुख्याधिकारी साहेब मिनीनाथ दंडवते, नायब तहसीलदार नवनाथ लांडगे, गीते साहेब , सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, व्यापारी असोशिएशन चे  प्रतिनिधी म्हणून मोबाईल असोशिएशन चे विजय आहुजा, सुनील जगताप, कापड असोशिएशन चे संजय कटारिया , कांतीलाल कोठारी,अजय कोठारी, आनंद गुगळे, विराज फुटाणे, उमेश नगरे...विनायक राऊत ,अमोल लोहकरे, पंकज भंडारी, आशुतोष छाजेड, सुरेश बोथरा , अभय शिंगवी,मंगेश बेदमुथा, पिंटूशेठ बोथरा, पिंटूशेठ बोरा, तुषार बोरा  बाळासाहेब मोरे आदी उपस्थित होते

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here