सिव्हिल हॉस्पिटल ‘ने वॉक इन लसीकरण’ची व्यवस्था सुरु करावी. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 9, 2021

सिव्हिल हॉस्पिटल ‘ने वॉक इन लसीकरण’ची व्यवस्था सुरु करावी.

 सिव्हिल हॉस्पिटल ‘ने वॉक इन लसीकरण’ची व्यवस्था सुरु करावी.

आयुक्त साहेब धन्यवाद वॉक इन लसीकरण सुरु केल्याबद्दल- बोज्जा


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः परदेशी जाणार्‍या विदयार्थ्यांसाठी वॉक इन लसीकरण ची व्यवस्था मुंबई महानगरपालिकेने ज्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी जायचे आहे त्यांना वॉक इन लसीकरण ची व्यवस्था केली त्याच धर्तीवर अहमदनगर येथे सुरु करावी अशी मागणी दिनांक 31/05/21 रोजी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी मा. आयुक्त व मा. आरोग्याधिकारी यांच्या कडे केली होती त्या अनुशंगाने काल दि.8/6/21 रोजी मा. आयुक्त यांनी आदेश करून सदरचे लसीकरण तोफखाना आरोग्य केंद्रामध्ये उपलब्ध केल्याचे कळविले ही अभिनंदनिय बाब असून याच धर्तीवर मा. जिल्हा शल्य चिकित्सक, सिव्हिल हॉस्पिटल, अहमदनगर यांनी सुरु करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी केली.
सध्या अहमदनगर शहरात असे अनेक विद्यार्थी आहेत की ज्यांना शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी परदेशात जायचे आहे परंतु प्रशासनाने वय वर्षे 21 ते 45 असलेल्या नागरिकांना लसीकरण बंद केले असल्यामुळे त्यांना लसीकरण उपलब्ध होत नव्हते व लसीकरण  घेतल्या शिवाय सदर विद्यार्थी व नागरिक यांना परदेशात जाण्यासाठी परवानगी मिळत नव्हती परंतु ही अडचण आता दूर झाल्याने सदर विद्याार्थ्यामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर लसीकरणची व्यवस्था सावेडी केंद्रावर सुरु करावी अशीही श्रीनिवास बोज्जा यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment