सुनंदाताई पवारांचा वाढदिवस साजरा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, June 1, 2021

सुनंदाताई पवारांचा वाढदिवस साजरा

 सुनंदाताई पवारांचा वाढदिवस साजरा


नगरी दवंडी/प्रतिनिधी
जामखेड ः आ. रोहित पवारांच्या मातोश्री सुनंदाताई पवार यांचा वाढदिवस राहुल उद्योग समूहाचे (जामखेड) वतीने विविध सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा करण्यात आला. दि 31 मे रोजी  राजकारणात राहून शुध्द समाजकारण कसं असतं हे ज्यांच्या कामातून दिसते अशा सुनंदाताई पवार यांचा वाढदिवस राहुल उद्योग समूहाचे वतीने साजरा करण्यात आला.
 गोरगरिबांच्या मदतीसाठी सदैव तत्पर  असणार्‍या सुनंदाताई पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेनेते पै. हवादादा सरनोबत व कुसडगावचे सरपंच बापूसाहेब कार्ले यांच्या संकल्पनेतून विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निवारा बालगृहातील अनाथ मुलांना तसेच आरोळे कोवीड सेंटरमधील रूग्णांना स्नेह भोजन देण्यात आले. साकेश्वर गोशाळेतील गाईंना पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या हस्ते हिरवा चारा देण्यात आला. तालुक्यातील कुसडगाव, डिसलेवाडी, फक्राबाद,धानोरा,भोगलवाडी,सरदवाडी आदी गावांमधील शेतकर्‍यांना गोल्डन जातीचे सिताफळाचे एक हजार वृक्ष लागवडीसाठी देण्यात आले. यावेळी त्या गावांचे सरपंच, उपसरपंच, मान्यवर व शेतकरी उपस्थित होते.
यावेळी पंचायत समितीचे सभापती सूर्यकांत मोरे, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, अँड अरुण जाधव, मनसे तालुकाध्यक्ष प्रदीप टापरे, सामाजिक कार्यकर्ते पै हवा सरनोबत, सरपंच बापूसाहेब कार्ले, पांडुरंग भोसले, आरोळे हाँस्पीटलचे संचालक रविदादा आरोळे, सुलताना शेख,मनसे उपाध्यक्ष सनि सदाफुले, बिभीषण कदम, भरत भोगल, शेखर कार्ले, बाला साठे, पप्पू क्षीरसागर, वैभव खोले, सोनु कदम, वशिष्ठ माने आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here