उड्डानपुल कामाच्या परिसरात अपघात होवू नये यासाठी उपाय योजना कराव्यात - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, June 10, 2021

उड्डानपुल कामाच्या परिसरात अपघात होवू नये यासाठी उपाय योजना कराव्यात

 उड्डानपुल कामाच्या परिसरात अपघात होवू नये यासाठी उपाय योजना कराव्यात

स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर शहरामध्ये हॉटेल अशोका ते सक्कर चौक या रस्त्यावर उडडान पुलाचे काम चालू आहे. तसेच कोठी रस्त्या लगत पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन शिप्ट करण्याचे काम चालू आहे. सदर भाग हा काळवटीच्या जमिनीचा असल्यामुळे ठिकठिकाणी रस्ता खचला जात आहे. त्यामुळे मोठमोठे खड्डे रस्त्यावर पडले आहेत. तसेच पुलाचे कामाची माती रस्त्या लगत टाकल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.  नुकताच एका तरूणाला आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या पावसाचे दिवस सुरू असून शहरात दररोज पाऊस पडत आहे. उड्डानपुलाच्या सुरू असलेल्या कामामुळे काळी माती रस्त्यावर येवून रस्ता निसरडा झाला आहे. त्यामुळे या रस्त्यावर रोज छोटे मोठे अपघात होत आहेत. नागारिकांना आपला जीव मुठीत धरून या रस्त्यावरून जावे लागते. शहरातील अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यामुळे मोठया प्रमाणात नागरिकांची रहदारी सुरू झाली आहे. तसेच अवजड वाहतुकही मोठया प्रमाणात होत असल्यामुळे ट्रॉफिक जाम होत आहे. तरी या रस्त्यावरील वाहतुक सुरूळीत व्हावी या दृष्टीने पाऊले उचलावी व उपाय योजना कराव्यात ठिकठिकाणी रस्त्यावर पडलेली माती उचलावी, ठिकठिकाणी पडलेले खड्डे बुजवावेत, रस्त्याचे मजबुतीकरण करावे. आवश्यक त्या उपाय योजना कराव्यात जेणे करून अपघात होणार नाही याची काळजी घ्यावी अपघात झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांची राहिल. अशा आशयाचे निवेदन प्रकल्प अभियंता यांना देण्यात आलेल्याची माहिती स्थायी समितीचे सभापती मा.श्री.अविनाश घुले यांनी दिली.

No comments:

Post a Comment