युवकांनी नोकरीच्या मागे न धावता आवडत्या क्षेत्रात करिअर करावे ः नवनाथ धुमाळ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, June 21, 2021

युवकांनी नोकरीच्या मागे न धावता आवडत्या क्षेत्रात करिअर करावे ः नवनाथ धुमाळ

 युवकांनी नोकरीच्या मागे न धावता आवडत्या क्षेत्रात करिअर करावे ः नवनाथ धुमाळ


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः आजकाल समाजातील सर्व युवक युवती फक्त नोकरीच्या मागे धावतात. त्यापेक्षा त्यांनी कला, क्रीडा, संगीत, गायन किंवा इतर आवडत्या क्षेत्रात चांगले करिअर करावे. त्यातून त्यांना चांगले अर्थाजन होऊ शकते असे प्रतिपादन नवनाथ धुमाळ (संस्थापक, लाईफ लाईन उद्योग समुह) यांनी महाराष्ट्राच्या महागायिका सन्मिता गणेश शिंदे यांच्या सत्कार प्रसंगी केले.
काल रविवार दिनांक 20 जून रोजी मराठा उद्योजक लॉबी व मराठी सोयरीक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नगर मधील हॉटेल सुवर्णम प्राइड येथे महाराष्ट्राच्या महागायिका ’सन्मिता  गणेश शिंदे यांचा सन्मान सोहळा पार पडला. कलर्स मराठी वाहिनीवरील सुर नवा ध्यास नवा महाराष्ट्राची महागायिका म्हणून केडगाव, अहमदनगर येथील रहिवासी असलेले महाराष्ट्रातील ख्यातनाम प्रवक्ते गणेश शिंदे यांच्या पत्नी ‘सन्मिता  गणेश शिंदे यांची नुकतीच महाराष्ट्राची महागायिका म्हणून निवड झाली. त्यामुळे मराठा उद्योजक लॉबीचे नगर जिल्हा मार्गदर्शक, मराठवाडा संपर्क प्रमुख राजेंद्र औताडे व मराठी सोयरीक चे संस्थापक अशोक कुटे  सर यांनी मराठा उद्योजक लॉबी राज्य कार्यकारिणीच्या सुचनेनुसार *’सन्मिता  गणेश शिंदे यांच्या सत्काराचे नियोजन केले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश सदस्य जयश्री अशोक कुटे, निर्भया फाउंडेशनच्या अध्यक्षा अपर्णा बानकर, उद्योजक लॉबी च्या महिला जिल्हाध्यक्षा जयश्री  चोभे, जिल्हाध्यक्ष संतोष कुटे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रसाद बानकर, मराठी सोयरीकचे संस्थापक अशोक कुटे सर, लॉबीचे मराठवाडा संपर्क प्रमुख राजेंद्र औताडे, सुप्रसिद्ध प्रवक्ते गणेशराव शिंदे हे उपस्थित होते.
यावेळी प्रसाद बानकर यांनी लॉबीची कार्यपद्धती, वाटचाल समजावून सांगितली. अशोक कुटे सर व प्रसाद बानकर यांनी  गणेश शिंदे आणि आपल्या मैत्रीच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. आपल्या बालमित्राने मिळवलेल्या उज्वल यशाबद्दल आनंद व्यक्त केला व त्या जोडीला शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून लॉबीचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रमोद झावरे सर, संदीप खरमाळे, शेवगांव येथील भगव्या झेंड्याचे प्रसिद्ध उत्पादक व लॉबीचे जिल्हा संघटक चंद्रकांत लबडे, जिल्हा पदाधिकारी रवीजा पिंगळे, संपर्कप्रमुख राहुल आढाव, माजी सैनिक सोमनाथ ढवळे, लॉबीचे संस्थापक अध्यक्ष मा.विनोद बढे, स्वप्निल काळे (राज्य कार्याध्यक्ष), चिंतेश्वर देवरे (संपर्कप्रमुख उत्तर महाराष्ट्र) या सर्व  पदाधिकार्‍यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. आपल्या कर्मभुमीवर सत्कार झाल्याबद्दल गणेश शिंदे व  सन्मिता  शिंदे यांनी आनंद व्यक्त करून लॉबीचे व सोयरीक संस्थेचे आभार मानले. भविष्यामध्ये मराठा उद्योजक लॉबी, निर्भया फाउंडेशन, मराठी सोयरिक संस्था यांसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे छान सूत्रसंचालन प्रमोद झावरे सर यांनी केले व आभार प्रसाद बानकर यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here