धारधार शस्त्राने युवकाची हत्या - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, June 4, 2021

धारधार शस्त्राने युवकाची हत्या

 धारधार शस्त्राने युवकाची हत्या

हल्लेखोर पसार.


अहमदनगर ः
नेवासा तालुक्यातील चांदा येथे काल रात्री नऊ ते साडेनऊच्या सुमारास एका युवकाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. चांदा येथील ज्ञानदेव सोपान दहातोंडे (वय 40) हे नदीजवळ चौकात थांबले होते. त्यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून जखमी केले आणि  पसार झाले. दहातोंडे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्यांचा मृत्यू झाला.
हा हल्ला नेमक कशातून झाला व कोणी केला याचा शोध पोलीस घेत आहेत. अपर पोलीस अधीक्षक दिपाली काळे, उपअधीक्षक सुदर्शन मुंढे, सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. हल्ल्याचे नेमके कारण समजलेले नाही. मात्र या प्रकाराने चांदासह परिसरात खळबळ उडाली आहे.

No comments:

Post a Comment