कोठी भागात येणार्‍या पाण्याचा निचरा होण्यासाठी उपाययोजनांच्या कामांना सुरुवात - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, June 10, 2021

कोठी भागात येणार्‍या पाण्याचा निचरा होण्यासाठी उपाययोजनांच्या कामांना सुरुवात

 कोठी भागात येणार्‍या पाण्याचा निचरा होण्यासाठी उपाययोजनांच्या कामांना सुरुवात

सभापती अविनाश घुले यांनी पाहणी करुन केल्या सूचना


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः पावसाळा सुरु झाल्याने रामचंद्र खुंट, हातमपुरा आदि भागातील पाणी कोठी रोड परिसरात येत असल्याने ते नागरिकांच्या घरामध्ये घुसत आहे. त्याचबरोबर सध्या उड्डाण पुलाचे काम सुरु असल्याने पिण्याच्या पाईपलाईन, ड्रेनेजलाईन, टेलिफोन लाईन आदिसह रस्ता खोदल्याने परिसरात चिखल त्याचप्रमाणे ड्रेनेज लाईन तुंबते व तेही घाण पाणी परिसरात पसरते. पाण्याचा निचरा व्यवस्थीत होत नसल्याने परिसरातील नागरिकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहेत. ही बाब परिसरातील सभापती अविनाश घुले यांच्या निदर्शन आणून दिली, त्यानंतर अविनाश घुले यांनी तातडीने मनपाचे संबंधित अधिकारी व कर्मचार्यांसह या परिसराची पाहणी करुन यावर उपायोजना करण्याच्या सूचना दिल्या. याप्रसंगी नगरसेविका रुपाली पारगे, माजी नगरसेवक रुपसिंग कदम, शहर अभियंता सुरेश इथापे, अभियंता निंबाळकर, दिलीप पंचमुख आदि उपस्थित होते.
यावेळी सभापती अविनाश घुले म्हणाले, सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने कोठी परिसरात शहरातील इतर भागातून पाणी येते. या भागात सुरु असलेल्या उड्डाणपुलासह विविध कामांमुळे ड्रेनेज, रस्ता यांची दुरावस्था झाल्याने परिसरात पाणी तुंबत आहे. याबाबत अधिकार्यांसह पाहणी करुन पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करण्याच्या कामास सुरुवात केली आहे, अधिकार्यांनीही प्रत्यक्षात पाहणी केल्याने त्यांच्याही समस्या लक्षात आल्याने तातडीने काम सुरु झाले आहे. त्यामुळे पुढील काळात या भागात पाणी साचणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे.  त्याचबरोबर नगर शहरातही नालेसफाईचे काम पुर्णत्वास आलेले आहे. ज्या भागात पाणी तुंबते त्या भागातही उपाययोजना करण्यात येत आहे, त्यामुळे नगर शहरात कोठेही पाणी तुंबणार नाही याची दक्षता मनपाच्यावतीने घेण्यात येत असल्याचे सभापती घुले यांनी सांगितले.
याप्रसंगी नगरसेविका रुपाली पारगे म्हणाल्या, प्रभागातील अनेक कामे मार्गी लागली असून, सध्या उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेऊन उपाययोजना करण्यात येत आहेत. असे सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here