करोना काळात डॉ.भंडारी यांनी योद्ध्याप्रमाणे काम करीत अनेकांना आधार दिला : सचिन डुंगरवाल - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, June 24, 2021

करोना काळात डॉ.भंडारी यांनी योद्ध्याप्रमाणे काम करीत अनेकांना आधार दिला : सचिन डुंगरवाल

 करोना काळात डॉ.भंडारी यांनी योद्ध्याप्रमाणे काम करीत अनेकांना आधार दिला : सचिन डुंगरवाल


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः करोनाच्या पहिल्या तसेच दुसर्‍या लाटेत वैद्यकीय क्षेत्राची मोठी कसोटी लागली होती. नगरमधील आनंदऋषीजी हॉस्पिटल या काळात अनेक रूग्णांसाठी नवे जीवन देणारे ठरले. या मोठ्या हॉस्पिटलचा प्रशासकीय कारभार अतिशय उत्तमरितीने सांभाळतानाच रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोठा आधार देण्याचे काम डॉ.आशिष भंडारी यांनी केले. एप्रिल, मे महिन्यात अक्षरश: रात्रंदिवस ते अथकपणे काम करीत होते. प्रत्येकाच्या अडचणीला धावून जाण्याचा त्यांचा स्वभाव मन जिंकणारा आहे. योद्ध्याप्रमाणेे काम करणारे डॉ.भंडारी हे आमच्या सर्वांचा अभिमान आहेत, असे प्रतिपादन सचिन डुंगरवाल यांनी केले.
आनंदऋषीजी हॉस्पिटलचे प्रशासन अधिकारी डॉ.आशिष भंडारी यांचा मित्र मंडळाच्यावतीने वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.
यावेळी अमोल कटारिया, विशाल भंडारी, राजेश चंगेडिया, प्रदीप भंडारी, संतोष चंगेडे, शुभम गांधी, विकास भंडारी, घनश्याम कलंत्री, सचिन मुनोत, प्रशांत डागा, आदित्य भंडारी, संजय पिपाडा, निलेश गुगळे, सोमेश चंगेडे आदी उपस्थित होते. डॉ.आशिष भंडारी म्हणाले की, आचार्यश्रींच्या नावाने असलेल्या हॉस्पिटलमध्ये काम करताना कायम त्यांची शिकवण लक्षात राहते. सर्वसामान्यांना जास्तीत जास्त चांगली सेवा देवून त्यांच्या चेहर्यावर आनंद फुलवणे हाच उद्देश समोर ठेवून काम करत असतो. करोना काळात अनेक जण अडचणीत सापडले. त्यांना मदत करताना कष्ट घ्यावे लागले. पण ज्येष्ठांचे आशिर्वाद, हॉस्पिटलचे विश्वस्त, सर्व डॉक्टर, मेडिकल स्टाफ, मित्र मंडळींचे पाठबळ व सहकार्य यामुळे नेहमीच काम करताना आनंद मिळाला.

No comments:

Post a Comment