शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ५०० कुटुंबीयांना सौरभ हाडवळे यांच्या वतीने औषधे वाटप ..! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, June 7, 2021

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ५०० कुटुंबीयांना सौरभ हाडवळे यांच्या वतीने औषधे वाटप ..!

 शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ५०० कुटुंबीयांना सौरभ हाडवळे यांच्या वतीने औषधे वाटप ..!
नगरी दवंडी

शिर्डी प्रतिनिधी -

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा ६ जून रोजी "शिवराज्याभिषेक दिन" संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा होतो. परंतु मागच्या वर्षी प्रमाणे यावर्षीही कोरोना चा प्रादुर्भाव वाढत्या स्वरूपाचा आहे सध्या परिस्थिती थोडीफार आटोक्यात असली तरी कोरोनाचा प्रादुर्भाव आहेच त्यामुळे शिवभक्तांनी साध्या पद्धतीने उत्साहात शिवराज्याभिषेक दिन साजरा केला तसेच शिर्डी मध्ये ही सामाजिक कार्यकर्ते सौरभ विठ्ठल हाडवळे यांनी शिवराज्यभिषेक दिनानिमित्त प्रभाग क्रमांक १४ मधील गणेशवाडी, प्रसादनगर, गोवर्धननगर येथील साधारणपणे ५०० कुटुंबियांना किरकोळ आजारासाठी लागणारे औषधे मोफत वाटून एक आगळा वेगळा उपक्रम साजरा करून शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. यापुढेही अशाच पद्धतीने वेगवेगळे उपक्रम राबवण्याचा मानसही व्यक्त करण्यात आला. यावेळी या उपक्रमासाठी हिंदू गर्जना प्रतिष्ठाणचे अध्यक्ष मनोज जाधव सामाजिक कार्यकर्ते साई कोतकर, अमर गायकवाड, स्नेह वाडेकर, विनायक शिंदे, योगेश निरभवणे, ऋषिकेश सोनवणे, ज्ञानेश्वर पाटील, प्रसाद जाधव, साई जाधव, पार्थ वांडेकर, मयूर अडांगळे व इतर मित्रपरिवार उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here