नियम न पाळल्यास दंडात्मक कारवाई करू उप अधीक्षक विशाल ढुमे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 8, 2021

नियम न पाळल्यास दंडात्मक कारवाई करू उप अधीक्षक विशाल ढुमे

 नियम न पाळल्यास दंडात्मक कारवाई करू उप अधीक्षक विशाल ढुमे


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः राज्य सरकारच्या निकषानुसार जिल्हा निर्बंधस्तर एकमध्ये येत असल्याने बाजारपेठ सुरू झाली आहे. कोरोना रूग्णसंख्या कमी झाली असली तरी संभाव्य तिसर्या लाटेचा धोका आहे. यामुळे शहरातील सर्व व्यापारी, दुकानदारांनी कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. कोरोना नियमांचे पालन न केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा शहर पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे यांनी दिला आहे. याबाबत पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांचे मार्गदर्शन घेऊन कोरोना नियमांचे पालन करण्याबाबतच्या नोटीसा व्यापारी, दुकानदारांना दिल्या जातील, असेही उपअधीक्षक ढुमे यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्याचा साप्ताहिक कोरोना पॉझिटिव्हीटी रेट 4.30 टक्के आणि ऑक्सिजन बेडवरील रूग्णांचे एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेडशी असलेले प्रमाण 24.48 टक्के दर्शविण्यात आले आहे. यामुळे जिल्हा अनलॉक करण्यात आला आहे. नगर शहरात आजपासून सर्व आस्थापना खुल्या झाल्या आहेत. व्यापार्यांनी कोरोना नियमांचे पालन करणार असल्याचे आश्वासन प्रशासनाला दिले आहेत. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता प्रशासनाकडून खबरदारी घेतली जाणार आहे. गर्दी न होऊन देणे, कोरोना नियमांचे पालन होते का? याकडे लक्ष देण्याचे काम प्रशासनाकडून केले जाणार आहे. यासंदर्भात शहर पोलीस सर्व व्यापार्यांना कोरोना नियमांचे पालन करण्यासाठी नोटीस देणार आहे.  उपअधीक्षक ढुमे म्हणाले, ”व्यापारी, दुकानदारांनी आपल्याकडी सर्व कामगारांना मास्क, सॅनिटायझरचा वापर करण्यास सांगावा, दुकानात गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. कोरोनाचे सर्व नियम पाळून प्रशासनास सहकार्य करावे, नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास अशा आस्थापनांवर दंडात्मक कारवाई होईल.”

No comments:

Post a Comment