मुलिकादेवीमध्ये एकदिवस स्पर्धा परीक्षा वेबिनार संपन्न - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, June 19, 2021

मुलिकादेवीमध्ये एकदिवस स्पर्धा परीक्षा वेबिनार संपन्न

 मुलिकादेवी महाविद्यालय विद्यार्थी घडवणारे केंद्र

मुलिकादेवीमध्ये एकदिवस स्पर्धा परीक्षा वेबिनार संपन्न

मेहनत आणि जिद्द ठरवलेले ध्येय गाठून देते सहाय्यक राज्य विक्री आयुक्त स्वाती थोरात



नगरी दवंडी

पारनेर  प्रतिनिधी 

पारनेर तालुक्यात निघोज येथील श्री. मुलिकादेवी महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राद्वारे आयोजित एकदिवस वेबिनारचे आयोजन शनिवार दि.१९ रोजी

करण्यात आले होते. या कार्यशाळे प्रसंगी मुंबई येथील सहाय्यक राज्य विक्री आयुक्त स्वाती थोरात यांचे ऑनलाईन मार्गदर्शन लाभले. या ऑनलाईन वेबिनारचा विषय 'स्पर्धा परीक्षाद्वारे करिअर आणि त्याचे स्वरुप' हा होता.

स्वाती थोरात यांनी यावेळी सांगितले की करिअरच्या नवनव्या टप्प्यांवर द्याव्या लागणाऱ्या परीक्षांना सामोरे जाताना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कसा करायचा व कुठल्याही परीक्षेची तयारी करताना त्या परीक्षेचे नेमके स्वरूप, आराखडा कसा असतो हे लक्षात घेणे उचित ठरते. 

स्पर्धा परीक्षेसाठी परीक्षेचे स्वरूप लक्षात घेऊन नियोजन करून व सकारात्मक विचार करून अभ्यास केल्यास यशाचा मार्ग अधिक प्रशस्त करता येतो. सामान्य ज्ञान, चालू घडामोडी हे घटक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत स्पर्धा परीक्षेमुळे संघर्ष करण्याची चिकाटी तयार होते व हीच चिकाटी, मेहनत आणि जिद्द, ठरवलेले ध्येय गाठून देते असे मार्गदर्शन थोरात यांनी या वेबिनारद्वारे केले.

या वेबिनार प्रसंगी प्रास्ताविक पाहुणे परिचय संदेशात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सहदेव आहेर यांनी सांगितले की आजचे स्पर्धेचे जग आहे. आयुष्य ही जणू स्पर्धा आहे.त्यामुळे स्पर्धा परीक्षेसाठी सामोरे जाताना जिद्द, आत्मविश्वास, चिकाटी, एकाग्रता, सातत्य, मेहनत, प्रामाणिकपणा, संयम हे गुण असणे आवश्यक आहे असे सांगितले. निघोज सारख्या ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्या स्पर्धा परीक्षेतील यशातून चांगल्या पदावर काम करत आहेत म्हणून 

मुलिकादेवी महाविद्यालय नेहमीच स्पर्धा परीक्षा केंद्राद्वारे विद्यार्थ्यासाठी अशा विविध व्याख्यानातून संधी उपलब्ध करून देत असते असे सांगून या वेबिनार साठी शुभेच्छा दिल्या.

या कार्यशाळेसाठी स्पर्धा परीक्षा तयारी करणारे जिल्ह्यातील, तालुक्यातील व परिसरातील अभ्यासक विद्यार्थ्या तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते. यावेळी दोनशे नवद व्यक्तीनी या वेबिनार मध्ये सहभाग नोंदविला.

या ऑनलाईन वेबिनारसाठी महाविद्यालयांतील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक प्रा. आनंद पाटेकर यांनी सूत्रसंचालन केले. तर आभार महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. मनोहर एरंडे यांनी मांडले.

या ऑनलाईन मार्गदर्शक शिबीराचा मेसेज सोशल मिडिया वर प्रसिद्ध होताच निघोज आणी परिसरातील जनतेने मुलिकादेवी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सहदेव आहेर यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले.स्वाती थोरात या सेवानिवृत्त कृषी अधिकारी स्व.नामदेवराव थोरात यांच्या कन्या आहेत. नोकरीच्या माध्यमातून थोरात साहेब पारनेर तालुक्यात असल्याने ते निघोज येथे स्थायिक होते.

स्वाती यांचे  प्राथमिक व माध्यमिक शिक्षण निघोज येथे पुर्ण झाले.उच्च शिक्षण पुणे येथे पुर्ण झाले.आई कमळाबाई व वडील नामदेवराव थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत राहाणाऱ्या स्वाती यांनी उच्चशिक्षित होउन वरिष्ठ अधिकारी म्हणून निघोजचा नावलौकिक राज्यात केला. आई कमळाबाई यांचे माहेर निघोजचे आहे.  या मुलाखतीच्या माध्यमातून केलेल्या मार्गदर्शनामुळे अनेकांनी स्वाती आणी मातोश्री कमळाबाई यांचे अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment