आमदार संग्राम जगताप यांचा नगर बाजाराची पाहणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, June 4, 2021

आमदार संग्राम जगताप यांचा नगर बाजाराची पाहणी

 आमदार संग्राम जगताप यांचा नगर बाजाराची पाहणी

टप्प्याटप्प्याने सुरू करणार बाजार पेठ


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शहरातील डाळ मंडई, आडते बाजार अनलॉकनंतर सुरु झाला आहे. नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी या दोन्ही ठिकाणांना भेट देत पाहणी केली. तेथील व्यापार्‍यांच्या अडचणी समजावून घेतल्या. टप्प्याटप्प्याने नगर शहरातील बाजारपेठ सुरू केली जाईल, असे आश्वासन त्यांनी व्यापार्‍यांना दिले.
जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी नगर शहरातील जीवनावश्यक सेवा सोबतच आडते बाजार, डाळ मंडईतील व्यापार सुरु करण्यास परवानगी दिली आहे. कोरोना  संसर्ग विषाणूचे सावट संपूर्ण जगावर आले आहे. नगर शहरातील नागरिकांनी व व्यापार्‍यांनी गेल्या दीड वर्षापासून सहकार्याची भूमिका बजावत आहे. नगर शहरातील विविध सामाजिक संस्थांनी पुढे येऊन संकट काळामध्ये मदतीचा हात दिला आहे. तसेच व्यापार्‍यांनी कोविडच्या दोन्ही लाटामध्ये प्रशासनाला सहकार्याची भूमिका बजावली आहे. शासन निर्देशानुसार आपले व्यवसाय बंद ठेवून सहकार्य केले. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी एकत्रित प्रयत्न यशस्वी झाल्याने आता नगर शहरातील सर्व बाजारपेठा टप्प्या-टप्प्याने सुरू होतील. गेल्या दोन महिन्यांपासून या बाजरपेठा बंद असल्यामुळे हमाल माथाडी कामगारांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. आता या बाजारपेठा सुरू झाल्यामुळे त्यांचा ही रोजगाराचा प्रश्न मार्गी लागला असल्याचे आमदार जगताप म्हणाले. त्यांच्यासमवेत नगरसेवक संजय चोपडा, मर्चंट बँकेचे संचालक कमलेश भांडरी, असोसिएशन सचिव संतोष बोरा, बाजार समितीचे संचालक राजेंद्र बोथरा, संजय लोढा, सतिष लोढा तसेच महापालिकेचे दक्षता पथकाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here