कोरोनाबरोबरच इतर आजारांबाबतही जागृत राहिले पाहिजे ः आ. संग्राम जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, June 18, 2021

कोरोनाबरोबरच इतर आजारांबाबतही जागृत राहिले पाहिजे ः आ. संग्राम जगताप

 कोरोनाबरोबरच इतर आजारांबाबतही जागृत राहिले पाहिजे ः आ. संग्राम जगताप

एकत्वम् फौंडेशन व गोरे डेंटल क्लिनिकच्यावतीने मोफत दंत शिबीर संपन्न


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे, ही एक चांगली बाब आहे. परंतु सर्वांनी काळजी घेतली तरच यावर आपण मात करु शकतो. वातावरण सर्वसामान्य होत असतांना कोरोनाबरोबरच इतर आजारांबाबतही जागृत राहिले पाहिजे. छोट-छोट्या आजारांचे रुपांतर मोठ्या आजारात होत असल्याने वेळीच उपचार होणे आवश्यक आहे. आज आरोग्य सेवा महाग होत असतांना मोफत तपासणी शिबीरांच्या माध्यमातून सर्वसामान्यांची मोठी सोय होत आहे. यासाठी एकत्वम् फौंडेशन व गोरे डेंटल क्लिनिक घेत असलेला पुढाकार समाजासाठी आदर्शवत आहे. समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी काम करुन समाजाप्रती असलेले दायित्व आपण पार पाडले पाहिजे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
केडगांव येथे एकत्वम् फौंडेशन व गोरे डेंटल क्लिनिकच्यावतीने मोफत दंत आरोग्य तपासणी शिबीराचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी फौंडेशनच्या अनुरिता झगडे, डॉ.सुदर्शन गोरे, प्रा. माणिक विधाते, डॉ.सुभाष बागले, डॉ.राजेंद्र सासवडे, अशोक तुपे, दिपक खेडकर, विशाल पाचारणे, वैभव कदम आदि उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ.सुदर्शन गोरे म्हणाले, कोरोनानंतर म्युकरमायकोसिस हा आजार उद्भवत आहे. त्यासाठी वेळेत काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठीच दंत तपासणी शिबीरात जबड्याच्या म्युकरमायकोसिस आजाराचीही  तपासणी करण्यात येत असून, वेळेत उपचार झाल्यास त्यावर मात करता येईल. तसेच रुट कॅनल, लहान मुलांचे दंतरोग, वेडेवाकडे दात आदिंवरही गोरे डेटेंल क्लिनिकमध्ये उपचार केले जात असल्याचे सांगितले.
प्रास्तविकात अनुरिता झगडे म्हणल्या, राजमाता जिजाऊ यांनी दिलेल्या प्रेरणेमुळेच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले. स्वराज्यातील प्रत्येकाची काळजी जिजाऊ घेत. त्यांचा आदर्श आपण घेऊन समाजात कार्य केले पाहिजे. तोच आदर्श समोर ठेवून फौंडेशन कार्य करत आहे. फौंडेशनच्या माध्यमातून कोरोना काळातही अनेक उपक्रमांद्वारे गरजूंना मदतीचा हात दिला आहे. आज दंत तपासणी शिबीराच्या माध्यमातून सर्वसामान्यांना मोफत उपचार मिळावेत यासाठी या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.  यापुढील काळात महिलांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी डॉ.सागर पंडित, डॉ.शेवगांवकर, बाळासाहेब भुजबळ, अनिल इवळे, शाम औटी, माऊली गायकवाड, राजेंद्र पडोळे, गणेश लोळगे, गणेश पाडळे, अक्षय शिंदे, सोनू घेबूड, मनिषा कोतकर, प्रविण पाटसकर आदि उपस्थित होते. शिबीरासाठी केडगांव जागृत मंच, ओबीसी व बारा बलुतेदार, संत सावता माळी संघ, फुले ब्रिगेड आदिंचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here