जामखेड येथे आठवडी बाजार सुरू करा - मंगेश दादा आजबे तहसीलदारांना निवेदन... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, June 24, 2021

जामखेड येथे आठवडी बाजार सुरू करा - मंगेश दादा आजबे तहसीलदारांना निवेदन...

 जामखेड येथे आठवडी बाजार सुरू करा - मंगेश दादा आजबे 

तहसीलदारांना निवेदन...नगरी दवंडी

जामखेड -आज दिनांक 24/6/2021. स्वाभिमानी शेतकरी पक्ष तालुका अध्यक्ष मंगेश दादा आजबे यांच्या नेतृत्वाखाली श्री विशाल नाईकवाडे तहसीलसाहेब यांना निवेदन देण्यात आले. जामखेड तालुक्यातील आठवडे बाजार व जनावरांचा बाजार चालू करण्यासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी पक्ष यांनी तहसीलदार साहेब यांना निवेदन दिले या निवेदनात मध्ये कष्टकरी, सर्वसामान्य शेतकरी व ज्यांचे हातावर पोट आहे अशा व्यक्तींसाठी शनिवारचा आठवडी बाजार अत्यंत महत्त्वाचा असल्याकारणाने व जनावरांचा बाजार चालू करणे संबंधी निवेदन देण्यात आले या निवेदनाची तातडीने दखल घेत तहसीलदार साहेब यांनी लवकरात लवकर निर्णय घेऊ असे आश्वासन दिले. प्रसंगी उपस्थित तालुका अध्यक्ष मंगेश दादा आजबे,तालुका युवक अध्यक्ष राहुल पवार,मा.सरपंच कृष्णा राजे चव्हाण,ऋषिकेश डुचे जिल्हा परिषद प्रमुख, कृष्णा डीजे सोशल मीडिया तालुकाध्यक्ष, भाऊसाहेब डोके जामखेड शहराध्यक्ष ,नितीन जगताप उपशहर प्रमुख जामखेड त्याचबरोबर असंख्य कार्यकर्ते, शाखा अध्यक्ष,उपाध्यक्ष व पदाधिकारी व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here