दुसर्‍या लाटेचं संकट अस्ताकडे! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, June 9, 2021

दुसर्‍या लाटेचं संकट अस्ताकडे!

 दुसर्‍या लाटेचं संकट अस्ताकडे! जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या 500 च्या आत.

देशातील कोरोनाचा संसर्ग मंदावला... कोरोना बळींची संख्या साडेतीन लाखांच्या पार


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः देशात भयावह परिस्थिती निर्माण करणारी कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली आहे. फेब्रवारीमध्ये देशात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेनं डोकं वर काढलं होतं. त्यानंतर रुग्णसंख्येचा विस्फोटच झाला. दुसर्‍या लाटेत जगात दैनंदिन उच्चांकी रुग्णसंख्या भारतात नोंदवली गेली. कोरोनाचा उद्रेक झाल्यानं रुग्ण आणि नातेवाईकांची उपचारासाठी प्रचंड फरफट झाली. मात्र, आता दुसरी लाटेची तीव्रता कमी होत असून, गेल्या 24 तासांतील कोरोनाची आकडेवारी दिलासा देणारी आहे. मागील आठवड्यापासून जिल्ह्यातील नागरिकांनी पाळलेल्या संयमामुळे नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारी दिवसेंदिवस घटत आहे. आज बुधवारी जिल्ह्याच्या आकडेवारीत घट झाली आहे. आज जिल्ह्यात फक्त 499 कोरोना बाधित आढळल्याने नगरकरांना दिलासा मिळाला आहे
नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा घटू लागल्यानंतर संपूर्ण जिल्ह्याचे लॉकडाऊन उठवण्यात आले आहे. या परिस्थितीतही नगरकर शासनाने ठरवून दिलेल्या नियमाचे पालन करत असल्यामुळे कोरोना बाधितांचा आकडा घटत आहे. यामुळे मोठा दिलासा मिळत असून नगरकरांनी नियमाचे पालन करत असाच संयम ठेवल्यास लवकरच नगर जिल्हा कोरोनामुक्त होईल.
आज आढळलेल्या आकडेवारीत संगमनेर तालुका सर्वोच्च स्थानावर असून आज येथे थोडीशी वाढ होत तो आकडा 61 वर पोहोचला आहे. मात्र तरीही दोन अनकी आकड्यामुळे दिलासा मिळत आहे. त्यापाठोपाठ पाथर्डी, अकोले, जामखेडचा क्रमांक लागतो. यापुढेही नगरकरांनी असाच संयम ठेवावा, नियमाचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
आज बुधवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 19, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 171 तर अँटीजेन चाचणीत 309 असे 499 कोरोना बाधित आढळून आले.
आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे- संगमनेर 61, पाथर्डी 57, अकोले 56, जामखेड 46, पारनेर 44, श्रीगोंदा 42, नेवासा 38, राहाता 35, श्रीरामपूर 33, कर्जत 15, राहुरी 15, नगर ग्रामीण 12, शेवगाव 12, कोपरगाव 11, नगर शहर 10, भिंगार 06, इतर जिल्हा 06 असे कोरोना बाधित आढळले आहे.
देशातील कोरोना परिस्थितीबद्दलची दैनंदिन आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात येते. देशातील गेल्या 24 तासांतील आकडेवारी दिलासादायक आहे. देशात काल दिवसभरात (8 जून) 92 हजार 596 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर याच कालावधीत एक लाख 62 हजार 664 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. मृतांची संख्याही दिवसेंदिवस कमी होत असून, गेल्या 24 तासांत देशात दोन हजार 219 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
राज्यात दिवसभरात काल 16 हजार 577 रूग्ण कोरोनातून बरे झाले. तर, 10 हजार 891 नवीन करोनाबाधित आढळून आले. 295 कोरोनाबाधितांच्या मृ्त्यूची नोंद झाली. राज्यात आजपर्यंत एकूण 55,80,925 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 95.35 टक्के झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर 1.73 टक्के इतका आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here