पाथर्डी पूर्व भागात कोवीड सेंटर सुरूच ठेवणार ः खेडकर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, June 14, 2021

पाथर्डी पूर्व भागात कोवीड सेंटर सुरूच ठेवणार ः खेडकर

 पाथर्डी पूर्व भागात कोवीड सेंटर सुरूच ठेवणार ः खेडकर


नगरी दवंडी/प्रतिनिधी
खरवंडी कासार ः पाथडी पूर्व भागातील कोराना सेंटर सुरू ठेवणार असे  भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर यांनी सांगितले, यावेळी बोलताना खेडकर म्हणाले की कोविड रुग्णांमध्ये कमी आली होती परंतु दोन दिवसापासून रुग्ण वाढले आहेत . संत भगवाबाबा कोविड सेंटर. खरवंडी कासार व लोकनेते गोपीनाथ मुंढे कोविड  सेंटर मुंगसवाडे , मोहोजदेवडे,या कोविड सेंटर मधुन आतापर्यंत 500 ते 600  रुग्न बरे झाले आहेत,  छत्रपती पतसंस्थेचे चेअरमण  जे पी ढाकणे यावेळी त्यांची संस्थाची इमारत कोराना रुग्णांसाठी  दिली . पाथर्डी  पूर्व भागात कोरोनामुळे अनेक लोकांना जीव गमवावा लागला होता , खेडकर यांच्या कोवीड  सेन्टर सुरू झाले असता एकही रुग्णांचा जीव गेला नाही. खेडकर यांनी  वेळीच धोका ओळखून   यांनी संत भगवान बाबा लोकनेते गोपीनाथ मुंडे हे कोविड सेंटर सुरू केले .   या कोविड  सेंटर मधुन तालुक्याचे नव्हे  तर बाहेरील जिल्हा तील रूग्ण  बरे झाले आहेत  . रुग्णांना पौष्टीक जेवण व  नाष्टा व त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन माणिक खेडकर यांनी केले यावेळी माणिक  खेडकर स्वतः रुग्णांची सेवा करताना दिसत आहेत व वेळोवेळी मार्गदर्शन करत आहेत यावेळी आरोग्य स्टाप व कर्मचारी यांनीही कोराना रुग्णांना योग्य असे उपचार केले यावेळी नागरिकांकडून माणिक मामा यांचे संकटाला धावुणारा  येणारा माणुस अशी ओळख निर्माण झाली आहे.

No comments:

Post a Comment