पालकमंत्री उद्या जिल्हा दौर्‍यावर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, June 4, 2021

पालकमंत्री उद्या जिल्हा दौर्‍यावर

 पालकमंत्री उद्या जिल्हा दौर्‍यावर


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे दोन दिवसांच्या जिल्हा दौर्यावर येत असून त्यांच्या दौर्‍याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. शनिवार दिनांक 5 जून 2021 रोजी दुपारी 3:30 वाजता पुणेहून अहमदनगर येथे आगमन आणि 4:30 वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह, अहमदनगर येथे राखीव.
सायंकाळी 4:30 ते 5:30 वाजता कोरोना उपाययोजना, लसीकरणाबाबत सर्व संबंधित लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांची जिल्हा आढावा बैठक (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर) सायंकाळी 5:30 वाजता पत्रकार परिषद (स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर) सायंकाळी 6 वाजता शासकीय विश्रामगृह अहमदनगरकडे प्रयाण, आगमन व मुक्काम. रविवार दिनांक 6 जून रोजी सकाळी 9 ते सकाळी 10:30 वाजता शिवस्वराज्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. बचतगटासाठीच्या साईज्योती अपचा शुभारंभ (स्थळ- जिल्हा परिषद कार्यालय, अहमदनगर) सकाळी 10:30 वाजता सकाळ अग्रोवन मार्ट व्ही,सी. द्वारे उदघाटन (स्थळ- जिल्हा परिषद कार्यालय, अहमदनगर) सकाळी 11 वाजता अहमदनगरहून लोणंदमार्गे कागल, जि. कोल्हापूरकडे प्रयाण.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here