शिर्डी संस्थानच्या ‘बॉडी’त राजकीय हस्तक्षेप नको- संभाजी ब्रिगेड. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, June 14, 2021

शिर्डी संस्थानच्या ‘बॉडी’त राजकीय हस्तक्षेप नको- संभाजी ब्रिगेड.

 शिर्डी संस्थानच्या ‘बॉडी’त राजकीय हस्तक्षेप नको- संभाजी ब्रिगेड.

शिर्डी संस्थान हा राजकीय पुढार्‍यांचा अड्डा...
धार्मिक, सामाजिक कार्यातील व्यक्तींना प्राधान्य द्यावे.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः
शिर्डी संस्थान हा राजकीय पुढार्‍यांचा अड्डा बनला आहे. त्यामुळे अनेक निविदा प्रक्रियेत करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. जगभरात पसरलेल्या साईबाबा भक्तांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे शिर्डी संस्थानवर कोणत्याही राजकीय व्यक्तीची नेमणूक न होता, सामाजिक धार्मिक क्षेत्रामध्ये काम करणार्‍या व्यक्तींची नियुक्ती करण्यात यावी. कारण यापूर्वी नगर जिल्ह्यातील भ्रष्ट राजकीय पुढार्‍यांचे पुनर्वसन करण्यासाठी संस्थानचा अनेक वेळा गैरवापर झाला आहे. मद्य निर्माण करणारे भ्रष्ट कारखानदार यांना या संस्थानवर संधी देऊन साईबाबांच्या विचारांची प्रतारणा करू नये.  प्रस्थापित, साखर सम्राट, मद्य सम्राट यांच्या नियुक्त्या होऊ नयेत, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शशिकांत चंगेडे यांनी केली आहे.  भोस यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून बिगर राजकीय व्यक्तींच्या काही नावांची यादीच दिली आहे.
भोस यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिर्डी (साईबाबा) संस्थानच्या अध्यक्षपदी अनेक वेळा राजकीय व्यक्तींची नेमणूक झाली आहे. त्यात अनेक गैरप्रकार व आर्थिक भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर आल्याने या संस्थानची बदनामी झाली आहे. शिर्डी हे देशभरातील सर्व धर्मियांचे श्रद्धा स्थान असून, करोडो साईभक्त दरवर्षी नित्यनियमाने दर्शनासाठी येतात व भक्ती भावाने अब्जावधी रूपयांचे मनोभावे दान  करतात. मात्र त्याचा योग्य विनियोग न झाल्याने शिर्डी येथे पाहिजे त्या सोई सुविधा आजही निर्माण झाल्या नाहीत.
धार्मिक क्षेत्रात काम करणारे- बद्रीनाथ महाराज तनपुरे, निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर), सामाजिक क्षेत्रात काम करणारे माजी कुलगुरू सर्जेराव निमसे, कायदे तज्ञ  असीम सरोदे, शिक्षण तज्ज्ञ  हेरंब कुलकर्णी, शेतकरी नेते अजित नवले,  राजू देसले, अशोक सब्बन यांच्या नावाचा विचार व्हावा.अशी मागणीही भोस यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here