कोरोना संकट काळात जिल्हा रुग्णालयाचे योगदान महत्त्वपूर्ण - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, June 12, 2021

कोरोना संकट काळात जिल्हा रुग्णालयाचे योगदान महत्त्वपूर्ण

 कोरोना संकट काळात जिल्हा रुग्णालयाचे योगदान महत्त्वपूर्ण

आ. संग्राम जगताप यांचे वाढदिवसानिमित्त जिल्हा रुग्णालयास 2 रुग्णवाहिका सुपूर्द


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कोरोनाचे महाभयंकर संकट आपल्यावर ओढावले आहे. गेल्या दीड वर्षापासून आपण सर्वजण या कोरोनाच्या संकटाला तोंड देत आहोत, या आजारामुळे आपल्याला मानवी आरोग्याचे महत्त्व पटले आहे. आरोग्य सेवा ही ईश्वरसेवा समजून अनेक सामाजिक संस्थांनी कोविड काळात चांगले काम केले आहे. अहमदनगर जिल्हा रुग्णालयाचे योगदान कोरोना संकटकाळात महत्त्वाचे आहे,सर्व आरोग्य यंत्रणेने या काळामध्ये महत्त्वपूर्ण जबाबदारी संभाळून नागरिकांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी कठोर परिश्रम घेतले असे मत आ. अरुण काका जगताप यांनी व्यक्त केलं. आ. संग्राम जगताप यांचे वाढदिवसानिमित्त आमदार निधीतून अरुण जगताप यांनी 2 रुग्णवाहिका जिल्हा रुग्णालयात सुपूर्द केल्या त्याप्रसंगी ते बोलत होते.
शहराचे आ.संग्राम जगताप यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आमदार निधी मधून जिल्हा रुग्णालयास दोन रुग्णवाहिका वाहिका जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्याकडे आ.अरुणकाका जगताप यांना सुपूर्द केल्या.
यावेळी बोलताना आ. संग्राम जगताप म्हणाले की,जिल्हा रुग्णालयाने संपूर्ण जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची सेवा केली. पुढील काळामध्ये आरोग्याचे महत्त्व ओळखून जिल्हा रुग्णालयाला दोन रुग्णवाहिका देण्यात आल्या यामधील एक रुग्णवाहिका अंध रुग्णांच्या उपचारासाठी वापरण्यात येणार आहे असे ते म्हणाले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांनी सांगितले की, आ. संग्राम जगताप यांनी दोन रुग्णवाहिका भेट देऊन महत्त्वाचे काम केले आहे याबाबत मी त्यांचे आभार मानतो असे ते म्हणाले. याप्रसंगी आ. संग्राम जगताप, स्थायी समिती सभापती अविनाश घुले, प्रा.माणिकराव विधाते, डॉ.सागर बोरुडे, विरोधी पक्षनेता संपत बारस्कर,नगरसेवक कुमारसिंह वाकळे, नगरसेवक समद खान, नगरसेवक विपुल शेठीया, नगरसेवक प्रकाश भागानगरे, ज्ञानदेव पांडुळे, उद्योजक वसीम हुंडेकरी, डॉ.राकेश गांधी, डॉ.शशिकांत फटाके, डॉ.समीर होळकर, डॉ.आशिष भांडरी, कार्तिक नायरा, भरत पवार, अरविंद शिंदे, विशाल पवार, ज्ञानेश्वर रासकर, गौतम मुथा, संभाजी पवार, अंबादास पंधाडे, अजिंक्य बोरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment