सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या हस्ते सिटीस्कॅन मशीन चे उदघाटन.... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, June 18, 2021

सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या हस्ते सिटीस्कॅन मशीन चे उदघाटन....

 सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या हस्ते सिटीस्कॅन मशीन चे उदघाटन.... नगरी दवंडी

जामखेड - जामखेड शहरातच सिटीस्कॅन मशीन उपलब्ध झाल्याने जामखेडसह तीन तालुक्यांची अडचण दूर झाली आहे. या मशीनद्वारे  तपासण्या अल्पदरात करून, याभागातील जनतेला आरोग्याच्या सुविधा पुरवाव्यात असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी केले आहे.

गुरुवारी (दि.१७)  जामखेड येथे ओम डायग्नोस्टिक सेंटर मध्ये सिटीस्कॅन मशिन बसवण्यात आले. या मशीनचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते तथा जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य संजय कोठारी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.यावेळी डाॅ,भरत दारकुंडे , डॉ.अर्जुन शेळके ,ओम हाॅस्पीटलचे संचालक संदीप ठोंबरे ,दिपक भोरे, आकाश घागरे सचिन ठोंबरे भुजंग गीते, विशाल ढवळे अभिषेक भोरे ,दत्ता साळुंखे, राम मुंडे, सुनील मोरे आदी उपस्थित होते.

यावेळी कोठारी म्हणाले , जामखेडसह पाटोदा, आष्टी  तालुक्यामध्ये एकच सिटीस्कॅन मशीन होते. त्यामुळे आरोग्य तपासणी करण्याकरिता सहा - सात तास नंबर लागत नव्हते. आता रूग्नांची प्रतिक्षा संपुन, तपासणी लवकर होणार आहे. तपासणी कमी दरात स्कॅन करावा म्हणजे गोरगरिबाला तपासणी करणे परवडेल. जामखेड तालुका हे जास्त लोकवस्तीचा  असल्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह  चे प्रमाण जास्त होते. आष्टी पाटोदा या तालुक्यातूनही बरेच लोक सिटीस्कॅन करण्यासाठी येत होते. सकाळी सहा वाजल्यापासून नंबर लावून दुपारपर्यंत त्यांचा नंबर लागत होता. त्यामध्ये लाईट जर गेली तर आठ तास नंबर लागत नव्हते आता दुसरे मशीन आल्यामुळे सर्वांची सोय होईल.

 यावेळी बोलताना येथील ग्रामीण रूग्नालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय वाघ म्हणाले , जामखेडला खरोखर गरज होती. जामखेडला एकच सिटीस्कॅन असल्यामुळे नंबर लागत नव्हते आणि रिपोर्ट यायला उशीर होत होता. आता दोन सिटीस्कॅन असल्यामुळे लवकर रिपोर्ट येतील आणि  रुग्णांवर ताबडतोब उपचार होतील. 

यावेळी डॉक्टर भरत दारकुंडे म्हणाले गेली पंधरा महिने पासून आम्ही कोरोना सेंटर चालू केले आहे अल्प दरात वैद्यकिय सेवा करून गोरगरिबांना सुविधा देण्याचे  काम केले. एकच सिटी असल्यामुळे  लोकांचे रिपोर्ट उशिरा येत होते. त्यामुळे आमची धावपळ होत होती. आम्ही गोरगरिबांना अथवा आलेल्या रुग्णांना सेवा देण्याचे काम करणार आहोत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here