सेवानिवृत्त शिक्षकांची मंजूर फरक देयके वेतन पथकात धूळखात पडून मुख्याध्यापकांवर कारवाई करा : शिक्षक संघटना - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, June 11, 2021

सेवानिवृत्त शिक्षकांची मंजूर फरक देयके वेतन पथकात धूळखात पडून मुख्याध्यापकांवर कारवाई करा : शिक्षक संघटना

 सेवानिवृत्त शिक्षकांची मंजूर फरक देयके वेतन पथकात धूळखात पडून मुख्याध्यापकांवर कारवाई करा : शिक्षक संघटना

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्यांची ऑफ लाईन 3% महागाई महाभत्ता मंजूर देयके केवळ शाळेतील लिपिकाने वेतन पथकातून बँकेत नेऊन न देता तसेच तीन महिन्यांपासून वेतन पथकात धूळ खात पडून दिली आहेत. तर काहींनी शाळेच्या कपाटात ठेवून दिली आहेत. काही ठिकाणी पैशाची मागणी केली जात आहे. याबाबत अहमदनगर महानगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष उद्धव गुंड, पदाधिकारी रमेश जाधव, रोहिदास कांबळे, प्रभाकर खणकर यांनी शिक्षणाधिकार्यांना निवेदन देऊन मुख्याध्यापकांवर कारवाईची मागणी केली आहे.
जाने.2019 ते मे 2019 या पाच महिन्यांची फरकाची रक्कम असून, केवळ वेतन पथकातून बँकेत नेऊन देयके न दिल्याने वेतन पथकात व शाळेच्या कपाटात धूळखात पडून आहेत. त्यामुळे सेवानिवृत्त शिक्षक लाभापासून वंचित राहिले आहेत. वेतन पथकात अनेक शाळांची बीले गठ्ठ्यात पडून आहेत. तर काही काही शाळांची बीले गहाळ झाली आहेत. त्यामुळे फरकाची बीले मिळतात की नाही? याबद्दल साशंकता निर्माण झाली आहे.
मुख्याध्यापकांच्या हलगर्जीपणामुळे तीन महिन्यांपूर्वी मंजुर झालेली बीले शाळेच्या वेतन खात्यावर जमा होऊनही मिळाली नाहीत. सेवानिवृत्तांची कोणीही फोन घेत नाही. शाळा त्यांना सहकार्य करीत नाही. त्यास सर्वस्वी मुख्याध्यापक जबाबदार आहेत. विलंब काळातील फरकावरील व्याज मुख्याध्यापकांकडून वसूल करावे. तसेच सुट्टीच्या काळात प्रशासकीय कामासही दिले जाणारे वेगळे वेतन, वाहतुक भत्ता वसूल करावा व योग्य ती कार्यवाही करावी, असे निवेदन जिल्हा प्रभारी (एकवर्षांपासून) शिक्षणाधिकारी रामदास हराळ यांना अहमदनगर महानगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ पदाधिकार्यांनी दिले आहेत. अन्यथा शिक्षणकारी कार्यालयासमोर काळे झेंडे दाखवून निदर्शने केली जातील, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment