रुग्णांची आर्थिक लूट करणार्‍या हॉस्पिटलची पोलखोल - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 2, 2021

रुग्णांची आर्थिक लूट करणार्‍या हॉस्पिटलची पोलखोल

 रुग्णांची आर्थिक लूट करणार्‍या हॉस्पिटलची पोलखोल

प्रांत ग्राहक संरक्षण परिषदेमुळे सुपा येथील रुग्ण अस्लम सय्यद यांना न्याय

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः कोरोना या जागतिक महामारीच्या काळात सर्वसामान्य नागरिक एकमेकांना आधार देण्याचे काम करीत आहेत. शासनाच्या माध्यमातून कोरोनाची लाट आटोक्यात यावी, यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. हॉस्पिटलकडून कोरोनाग्रस्तांकडून आर्थिक लूट होऊ नये, यासाठी उपचाराचे शासकीय दर निश्चित करण्यात आले आहेत. एखादे दुसरे हॉस्पिटल सोडले, कोणीच रुग्णाकडून शासकीय दाने पैसे घेतल्याचे चित्र सध्या दिसत नाही. हॉस्पिटलकडून सुरू असलेली ही नियमबाह्य आर्थिक लूट थांबावी, त्याला आळा बसावा, या उद्देशाने प्रांत ग्राहक संरक्षण परिषद समितीने पुढाकार असून, कोरोनाग्रस्तांची आर्थिक लूट करणार्या हॉस्पिटलचे पोलखोल करण्यात येणार असल्याचे समितीचे जिल्हाध्यक्ष बद्रिनाथ चिंधे यांनी कळविले आहे.
समितीच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, मागील सव्वा वर्षांपासून कोरोना महामारीमुळे सर्वसामान्य जनतेला जगणे मुश्किल होत असताना अशा प्रकारची लूट करणे ही खूप क्लेशदायक व लाजिरवाणी गोष्ट आहे. समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष बद्रिनाथ चिंधे, जिल्हा उपाध्यक्ष जावेद सय्यद व सचिव दत्तात्रय म्हसे यांनी रुग्णांना दिलासा देण्याचे काम हाती घेतले आहे. ज्या रुग्णांना हॉस्पिटलविरुद्ध तक्रार करावयाची आहे, त्यांनी समितीचे जिल्हा समन्वयक तेजस बेलदंडी (मो. 8793717266) संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सुपा येथील रहिवासी अस्लम सय्यद हे नगरमधील सुविधा हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल झाले. परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांच्या मित्रपरिवाराने पैसे जमा करून त्यांना मदत केली. हॉस्पिटलने नियमबाह्य बिल लावून पैसे लाटण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात सय्यद यांनी प्रांत ग्राहक संरक्षण परिषद समितीशी संपर्क करून वरील प्रकार लक्षात आणून दिल्यानंतर परिषदेच्या पदाधिकार्यांनी बिलाची शहानिशा करीत हॉस्पिटलने जास्तीचे लावलेले 40 हजार रुपयांचे बिल करून करून देण्याकामी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. परिषदेकडे शेख शहनावाज मुसा (टाकळी खातगाव), कल्याणी बोर्हाडे (रेणुकानगर, बोल्हेगाव फाटा), हरिभाऊ बडे (पाथर्डी) यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यांच्या बिलांची शहानिशा करून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न परिषद करीत आहे.

No comments:

Post a Comment