विकास कामांबरोबर शहराच्या सौदर्यकरणात भर घालणार - आ.संग्राम जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, June 1, 2021

विकास कामांबरोबर शहराच्या सौदर्यकरणात भर घालणार - आ.संग्राम जगताप

 विकास कामांबरोबर शहराच्या सौदर्यकरणात भर घालणार - आ.संग्राम जगताप\

सारसनगर मधील ओम कॉलनी परिसरातील रस्ता कॉक्रीटीकरणाचा शुभारंभ


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः
विकास कामा बरोबर शहराच्या सौदर्यकरणात भर घालण्यासाठी उपाय योजना करण्यात येतील विकास कामाचा अनुक्रम ठरवून विकास कामे केल्यास पुन्हा पुन्हा ती कामे करावी लागत नाही यासाठी जमिनी अंतर्गत सर्व कामे करणे गरजेचे आहे. शहरात फेज 2 पाणी योजनेचे काम पूर्णत्वाकडे आले आहे याच बरोबर भुयारी गटर योजनेचे कामही सुरू आहे. यानंतर रस्त्याची कामे हाती घेतली आहे. सौदर्यी करणात भर घालण्यासाठी चौक सुशोभिकरण करण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूने वृक्षारोपण करून संवर्धन करणे याच बरोबर पेव्हींग ब्लॉक बसविणे शहराचा स्वच्छतेचा प्रश्नही मार्गी लागला असल्यामुळे कचराकुंडीमुक्त शहर झाले आहे. शहर सुशोभिकरणासाठी नागरिकांच्या सहकार्याची गरज असते यासाठी नागरिकांनी पुढे येवून सहकार्य करावे असे मत मा.आ.श्री.संग्रामभैय्या जगताप यांनी व्यक्त केले.
प्र.क्र. 14 मधील सारस नगर परिसरातील ओम कॉलनी परिसरातील रस्ता कॉक्रीटीकरण कामाची पाहणी मा.आ.श्री.संग्रामभैय्या जगताप यांनी केली यावेळी नगरसेवक मा.श्री.गणेश भोसले, मा.श्री.प्रकाश भागानगरे, मर्चट बॅकेचे संचालक मा.श्री.संजय चोपडा, मा.श्री.विजय शिंदे, मा.श्री.तात्यासाहेब औसरकर, मा.श्री.चेतन जाधव, मा.श्री.भाऊसाहेब कळमकर, मा.श्री.नंदू लोणकर आदीसह नागरिक उपस्थित होते.
यावेळी नगरसेवक मा.श्री.प्रकाश भागानगरे म्हणाले की, मा.आ.श्री.अरूणकाका जगताप व मा.आ.श्री.संग्रामभैय्या जगताप, यांच्यामुळेच सारसनगर भागाच्या विकासाला चालना मिळाली आहे. गेल्या 10 वर्षामध्ये विकास कामातून सारसनगर भागाचा कायापालट झाला आहे. आता या भागाच्या विकास कामासाठी मोठा निधी प्राप्त झाला असून टप्प्या टप्प्याने सर्व विकास कामे मार्गी लागतील. विकास कामाचे दिलेले आश्वासने आता पूर्ण होत आहेत असे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here