ऑक्सिजनचा मुख्य स्त्रोत असलेली झाडे लावून जगवण्याची गरज ः गणेश शिंदे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 16, 2021

ऑक्सिजनचा मुख्य स्त्रोत असलेली झाडे लावून जगवण्याची गरज ः गणेश शिंदे

 ऑक्सिजनचा मुख्य स्त्रोत असलेली झाडे लावून जगवण्याची गरज ः गणेश शिंदे

माधवनगर परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वृक्षारोपण मोहिमेला सुरुवात


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्ताने केडगाव येथील माधवनगर परिसरात वृक्षरोपन मोहिमेला सुरुवात करण्यात आली.
यावेळी यावेळी जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकर, उपजिल्हाध्यक्ष मनोज राऊत, जिल्हासचिव नितीन भुतारे, मनसेचे उपशहर अध्यक्ष गणेश शिंदे, महिला आघाडी अनिता दिघे, परेश पुरोहित, अमन काझी ,विनोद काकडे, संकेत व्यवहारे, संतोष साळवे, संकेत होसिंग, अनिकेत जाधव आदी सह पदाधिकारी उपस्थित होते.  
मनसेचे उपशहर अध्यक्ष गणेश शिंदे म्हणाले की पर्यावरणाचे संवर्धन साधण्यासाठी वृक्षारोपण हा एकमेव पर्याय आहे कोरोणा च्या दुसर्‍या लाटेत देशापुढे ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता त्यामुळे ऑक्सिजनचा मुख्य व एकमेव स्त्रोत असलेली झाडे लावून ती जगवण्यात येणार आहे व केडगाव भागामध्ये येणार्‍या काळात संपूर्ण परिसरामध्ये हरितक्रांती घडून विविध ठिकाणी वृक्षारोपणाचे कार्यक्रम राबवले जाणार आहे व औचित्य कोणताही असला तरी वृक्षारोपणाचा कार्यक्रम हा घेण्यात येणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment