केडगाव मधील ‘त्या’ बनावट हॉस्पिटल वर कार्यवाही करा. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 15, 2021

केडगाव मधील ‘त्या’ बनावट हॉस्पिटल वर कार्यवाही करा.

 केडगाव मधील ‘त्या’ बनावट हॉस्पिटल वर कार्यवाही करा.

भांबरकर यांचे पोलीस अधिक्षक व महापालिका आयुक्तांना स्मरणपत्र


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः स्वतः वैद्यकीय पेशात नसताना हॉस्पिटल चालवून नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचे प्रकार अनेक शहरात पाहावयास मिळाले आहेत. तसाच प्रकार केडगाव मध्येही चालू असून येथील रेणुकामाता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हे डॉ. प्रिती राजेंद्र हंगे यांचे असताना त्यांनी हे हॉस्पिटल संदीप वाळुंज यांना कामकाज पाहण्यासाठी दिले आहे. आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगेंच्या पाठबळावर हे हॉस्पिटल चालू असून बनावट प्रमाणपत्राच्या आधारे हॉस्पिटल चालवून रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण केला व कोरोना रुग्णांचा जीव गेल्याप्रकरणी  डॉ. प्रीती हंगे, संदीप वाळूंज व मनपा कर्मचारी औटी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, याबाबत महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. बोरगे यांनी दुर्लक्ष केले असल्यामुळे त्यांच्यावरही ही कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते संदीप भांबरकर यांनी पोलीस अधीक्षक व मनपा आयुक्त यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
भांबरकर यांनी पोलिस अधीक्षक व आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मनपा हद्दीत योग्य पदवीधारक वैद्यकीय व्यवसायिक यांनाच हॉस्पिटल चालविण्याचा अधिकार आहे. असे असतानाही केडगाव या ठिकाणी रेणुकामाता मल्टीस्टेट हॉस्पिटल हे डॉ. प्रीती राजेंद्र हंगे यांच्या नावाने चालू आहे. परंतु डॉ. प्रीती हंगे यांनी स्वतः रुग्णांची देखभाल न करता संदीप वाळुंज हाच त्या ठिकाणी हॉस्पिटलचे कामकाज पाहत होते. तसेच या प्रकरणी अधिक माहिती घेतली असता हॉस्पिटलचा नोंदणी दाखल्यावर आरोग्य अधिकारी यांची सही नाही. तर हा दाखला डॉ.प्रिती हंगे, संदीप वाळूंज व मनपा आरोग्य विभागातील औटी यांनी केवळ स्वतःच्या खाजगी फायद्यासाठी तयार केला असून त्यास तत्कालीन महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांची मुक सहमती होती. असे असतानाही या व्यक्तीने संबंधित हॉस्पिटलच्या नावाने जिल्हाधिकारी कार्यालयातून रेमडेसिविर याची मोठ्या प्रमाणात मागणी करून ते संबंधित हॉस्पिटलच्या नावाने उपलब्ध करून घेतले. हॉस्पिटलमध्ये कोरोना सेंटर सुद्धा चालविले व त्यामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण मृत्यू पावले. मध्यंतरी महापालिका आरोग्य अधिकारी बोरगे व आरोग्य कर्मचारी औटी यांच्याजवळ बेकायदेशीरपणे रेमडेसिविर इंजेक्शन सापडले होते.  ते याच हॉस्पिटलच्या नावाने महापालिकेत जिल्हाधिकार्यांमार्फत उपलब्ध झाले होते. त्यासंबंधि पोलिस चौकशी सुरू आहे. संबंधित घटनेची संपूर्ण माहिती आरोग्य अधिकार्यांना असल्यामुळे ते पोलिस चौकशीला जात नसल्याचे स्मरणपत्रात म्हंटले आहे.

No comments:

Post a Comment