तेलिखुंट परिसरात पोलिसांकडून दंगल नियंत्रण पथकाचे प्रात्यक्षिक - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, June 15, 2021

तेलिखुंट परिसरात पोलिसांकडून दंगल नियंत्रण पथकाचे प्रात्यक्षिक

 तेलिखुंट परिसरात पोलिसांकडून दंगल नियंत्रण पथकाचे प्रात्यक्षिक


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः एखादी घटना घडल्यानंतर पोलिस किती वेळा मध्ये पोहोचताच त्याचा आढावा घेण्यासाठी वेगळ्या प्रकारची प्रात्यक्षिके सातत्याने होत असतात. नगर शहरामध्ये तेलीखुंट भागांमध्ये अशा प्रकारचे एक प्रकारचे प्रात्यक्षिक पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. नगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशानंतर ही अंमलबजावणी करण्यात आली. नगर शहरामध्ये नेमके काय झाले , कुठे काय झाले याची चर्चा आज सायंकाळच्या सुमाराला सगळीकडे पाहायला मिळाली. जिल्ह्यामध्ये व शहरामध्ये जर काही घटना घडली, तर पोलीस खाते घटनास्थळी किती वेळा मध्ये दाखल होते, हे पाहण्यासाठी दंगल नियंत्रण पथकाचा एक डेमो म्हणजेच  प्रात्यक्षिक आज घेण्यात आले. यामुळे नागरिकांमध्ये सुरू झालेल्या चर्चाना पूर्णविराम मिळाला.
आज सायंकाळी पाचच्या सुमाराला तेलीखुंट  येथे अचानक पणे चारही बाजूंनी पोलीस एकाच ठिकाणी आले व त्यांनी ज्या ठिकाणी एकत्र येऊन तेथील भागांमध्ये संचालन केले .याच परिसरात नगर जिल्ह्याची मुख्य बाजार पेठ कापड बाजार ,आडते बाजार असल्यामुळे तेथील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते, नेमके नगर शहरामध्ये काय झाले, पोलीस का जमा झाले? याची चर्चा सुरू होती. अखेरीस हा प्रात्यक्षिकाचा एक प्रकारचा सराव होता, हे कळल्यानंतर अनेकांनी सुटकेचा श्वास सोडला. नगर जिल्ह्यामध्ये दंगल नियंत्रण पथक ,रॅपिड ऍक्शन फोर्स यासह विविध प्रकारचे पोलिसांचे पथक या प्रात्यक्षिकांमध्ये सहभागी झाले होते. तसेच रुग्णवाहिका महानगरपालिकेचे अग्निशमन दलाचे पथक हे सुद्धा यामध्ये सहभागी झाले होते.
एखादा आपत्तीचा प्रसंग घडला, तर पोलिस प्रशासनाने सुद्धा दक्ष राहिले पाहिजे. या उद्देशाने ही मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेमध्ये नगर विभागाचे पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे यांच्या नेतृत्वाखाली तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्यासह तोफखाना पोलीस, कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर व त्यांच्या पथकाने तसेच कॅम्प पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक देशमुख यांच्या पथकाने ही कामगिरी यावेळी केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here