गाता रहे मेरा दिल ग्रुपच्यावतीने शरदचंद्र पवार आरोग्य मंदिरात गीतांची मैफिल - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, June 12, 2021

गाता रहे मेरा दिल ग्रुपच्यावतीने शरदचंद्र पवार आरोग्य मंदिरात गीतांची मैफिल

 गाता रहे मेरा दिल ग्रुपच्यावतीने शरदचंद्र पवार आरोग्य मंदिरात गीतांची मैफिल

कोरोना रुग्णांना हिंदी-मराठी गीतांची भुरळ


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः
आमदार निलेश लंके यांनी भाळवणी येथे कोरोना बाधित रुग्णांसाठी सुरु केलेल्या 1100 रुग्णांसाठीच्या शरदचंद्र पवार आरोग्य मंदिरातून मोफत सेवा देत आहेत. या मानवतेचे कार्य सहकार्यांच्या मदतीने होत आहे. आरोग्य सेवेबरोबरच रुग्णांच्या मानसिकतेचा विचार करुन त्यांनी आजाराला विसरुन लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी रोज आरोग्य मंदिरात धार्मिक, अध्यात्मिक, सांस्कृतिक व करमणुकीचा कार्यक्रमाचे आयोजन करुन त्यांना मोठा आधार देत आहेत. कोरोना बाधित झालेल्या रुग्णांना कोविड सेंटर किंवा हॉस्पिटलमध्ये अडमीट असल्यामुळे त्यांना करमणुकीचे कोणतेही साधन नसतात. अशावेळी आ.लंके यांनी रुग्णांच्या मानसिकतेचा विचार करुन अशा कार्यक्रमातून रुग्णांमध्ये आत्मविश्वास वाढला जात आहे, असे प्रतिपादन गाता रहे मेरा दिल ग्रुपचे अ‍ॅड. अमिन धाराणी यांनी केले.
आ.निलेश लंके यांनी सुरु केलेल्या शरदचंद्र पवार आरोग्य मंदिरात रुग्णांच्या करमणुकीसाठी गाता रहे मेरा दिल ग्रुपच्यावतीने हिंदी-मराठी गीतांची सुरेल मैफिल आयोजित करण्यात आली होती. यावेळी अ‍ॅड. धारानी बोलत होते. या कार्यक्रमात अ‍ॅड. गुलशन धारानी, किरण उजागरे, डॉ. रेश्मा चेडे, समीर खान, प्रतिभा साबळे, विकास खरात, अ‍ॅड. अमीन धारानी, सुनिल भंडारी, अनिल आंबेकर यांनी गिते सादर केली. मोफत कार्यक्रम केल्याबद्दल आ.निलेश लंके यांनी ग्रुपचे आभार मानले. याप्रसंगी समीर खान म्हणाले, ग्रुपच्यावतीने नेहमीच सामाजिक दायित्व जपून विविध संस्थांना मदतीसाठी नेहमीच कार्यक्रम आयोजित केले जातात त्यातून जमा होणार्या रक्कम संस्थेसाठी मदत दिली जाते. सध्या कोविड सेंटरमध्ये रुग्णांमध्ये भितीचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत आध्यात्मिक व मनोरंजनात्मक कार्यक्रम राबवून आरोग्य सेवेबरोबरच आ.निलेश लंके रुग्णांसाठी मोठा आधार बनत आहेत.

No comments:

Post a Comment