योगासने निरोगी जीवनशैली आणि चांगले जीवन जगण्यास मदत करते ः सौ. येनगंदुल - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, June 24, 2021

योगासने निरोगी जीवनशैली आणि चांगले जीवन जगण्यास मदत करते ः सौ. येनगंदुल

 योगासने निरोगी जीवनशैली आणि चांगले जीवन जगण्यास मदत करते ः  सौ. येनगंदुल

पद्मशाली महिला शक्तीच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा  


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः पद्मशाली महिला शक्ती, पद्मशाली युवा शक्ती आणि पद्मनादम ढोल ताशा ध्वज पथक यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन चे आयोजन मार्कंडेय संकुल, दात रंगे मळा येथे आयोजन केले होते. कोरोना महामारी असल्याने सदर कार्यक्रम हा ऑनलाईन माध्यमातून घेण्यात आला. सदर कार्यक्रम सकाळी 6 ते 9 या वेळेत घेण्यात आला. या मध्ये 70 महिलांनी ऑनलाईन सहभाग घेतला. मार्कंडेय महामुनींच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
सौ. दिपाली येंनगंदुल यांनी योगासन विषयी सखोल माहिती दिली. ते म्हणाले, जीवनात योगा केला तर योगा एक चांगली पद्धत आहे.
निरोगी जीवनशैली आणि चांगले जीवन जगण्यास मदत करते. योगा आणि मेडीटेशन द्वारे कोरोना सारख्या महामारीच्या काळात देखील आपण आपले सौरक्षण  करू शकतो.  कोणताही त्रास न घेता संपूर्ण जीवन तंदुरुस्त होण्याचा योगा हा एक अतिशय सुरक्षित, सोपा आणि निरोगी मार्ग आहे. शरीराच्या हालचाली आणि श्वासोच्छवासाच्या योग्य मार्गासाठी फक्त नियमित सराव आवश्यक आहे. हे शरीर, मन आणि आत्मा यासारख्या आपल्या शरीराच्या तीन घटकांमधील संबंध नियमित करते, असे त्यांनी यावेळी सांगितले.
आकाश डान्स स्टुडिओ चे श्री. आकाश अंदे सर यांनी महिलांना बेली डान्स विषयी माहिती देऊन तो कसा करायचं त्याचे प्रत्यक्षिक करून दाखविले. यावेळी सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
पद्मशाली महिला शक्ती च्या आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ. सुरेखा विद्ये, सौ. लता पुलगम, सौ. उमा बडगु, सौ. सारिखा सिद्दम,सौ. सुरेखा कोडम, सौ. नीता बल्लाळ, सौ. सविता येंगंदुल, सौ. सरिखा येंगंदुल, सौ. मोहिनी गुंडू व पद्मशाली युवा शक्ती कडून श्री. श्रीनिवास इप्पलपेल्ली, दिपक गुंडू, योगेश म्याकल, सतीश चिंता, योगेश ताटी, अजय म्याना, सागर बोगा, सुमित  इप्पलपेल्ली, विराज म्याना, आनंद गुंटूक,सागर आरकाल, विशाल गाजुल, शुभम बुरा, सागर गाजुल यांनी अथक परिश्रम केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here