धर्मवीर युवा प्रतिष्ठानच्या स्वच्छता विषयक कार्याची दखल राज्यपातळीवर घेण्यासारखी ः महापौर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, June 19, 2021

धर्मवीर युवा प्रतिष्ठानच्या स्वच्छता विषयक कार्याची दखल राज्यपातळीवर घेण्यासारखी ः महापौर

 धर्मवीर युवा प्रतिष्ठानच्या स्वच्छता विषयक कार्याची दखल राज्यपातळीवर घेण्यासारखी ः महापौर

मनपाच्या वतीने धर्मवीर युवा प्रतिष्ठानचा गौरव


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हातात झाडू घेवून देशाला स्वच्छतेचा संदेश दिला. या संकल्पनेतून शहरातील धर्मवीर युवा प्रतिष्ठानच्या वतीने सलग दर रविवारी 36 आठवडे महापुरूषांचे पुतळे, उदयान, रस्ते, शाळेचा परिसर स्मशान भूमी, इतर सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता अभियान राबवून सकारात्मक दृष्टीकोनातून व सामाजिक बांधीलकीतून हा उपक्रम राबविला. आपण सर्वजण कोरोनाच्या कठीण काळातून जात असताना धर्मवीर युवा प्रतिष्ठान, नालेगांव मधील युवकांनी पुढे येवून समाजा समोर स्वच्छतेचा आदर्श ठेवला. इतर मंडळांनीही यांच्या कामाचा आदर्श घ्यावा आपला परिसर स्वच्छ सुंदर असावा या माध्यमातून नागरिकांचे आरोग्य सदृढ व निरोगी राहण्यास मदत होते. नालेगांव येथील धर्मवीर युवा प्रतिष्ठानचे कार्य लोकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्याची दखल राज्यपातळीवर घेण्यासारखी असल्याचे प्रतिपादन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले.
अहमदनगर महानगरपालिके च्या वतीने धर्मवीर युवा प्रतिष्ठानच्या वतीने सलग 9 महिने स्वच्छता अभियान राबविल्याबद्दल सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरव करताना महापौर बाबासाहेब वाकळे, स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले, सभागृह नेता रविद्र बारस्कर, उपायुक्त यशवंत डांगे, नगरसेवक डॉ. सागर बोरूडे, राहुल कांबळे, निखील वारे, सचिन जाधव, संजय ढोणे, भाजपाचे नेते विवेक नाईक, सतिष शिंदे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय चितळे, मार्गदर्शक विजय चितळे सर, पुष्कर कुलकर्णी, राजेश लयचेट्टी, किशोर कानडे तसेच प्रतिष्ठानचे सर्व सदस्य उपस्थित होते.
उपायुक्त यशवंत डांगे म्हणाले की, शहर स्वच्छतेसाठी मनपा प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. स्वच्छता अभियाना मध्ये नागरिकांनी स्वयंप्रेरणेचे सहभाग घेतल्यास शहर स्वच्छ होवून आरोग्य विषयक समस्या निर्माणच होणार नाहीत. धर्मवीर प्रतिष्ठानने केलेले काम कौतुकास्पद आहे. त्यांच्या कामाला मनपाचे नेहमीच सहकार्य राहील. शहरामधील ओला व सुका कचरा वेगळा होण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृतीची गरज आहे असे ते म्हणाले. स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले म्हणाले की, प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय चितळे यांनी राबविलेले स्वच्छता अभियान समाजासाठी प्रेरणादायी आहे. भारत स्वच्छता अभियानामध्ये भाग घेवून समाजासमोर एक आदर्श ठेवला. विधायक कामासाठी समाज नेहमीच बरोबर येत असतो. अशा चांगल्या कामाला प्रोत्साहन मिळावे व पाठीवर शब्बासकीची थाप मिळावी यासाठीच आजचा सत्कार सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे.
अजय चितळे म्हणाले की, सर्व युवकांना बरोबर घेवून सलग 36 रविवारी शहरामध्ये विविध ठिकाणी स्वच्छता मोहिम राबविली ओला सुका कचरा वेगळा करण्यासाठी जनजागृती करू. प्लॅस्टिक मुक्तीसाठी आमचे प्रतिष्ठान काम करित आहेत. विविध सामाजिक संस्था, गणेश मंडळ, बचत गट यांना एकत्र घेवून शहरामध्ये स्वच्छतेचे महाअभियान राबविण्यासाठी आम्ही पुढाकार घेवू. मनपाने आमच्या कार्याची दखल घेवून आमचा सन्मान केला त्याबद्दल मी मनपाचा आभारी आहे. प्रस्ताविक निखील वारे यांनी केले. आभार प्रदर्शन विजय चितळे यांनी मानले यावेळी प्रतिष्ठानचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment