सभापती काशिनाथ दाते यांनी सोडवला अनेक वर्षापासूनचा प्रलंबित प्रश्न! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 16, 2021

सभापती काशिनाथ दाते यांनी सोडवला अनेक वर्षापासूनचा प्रलंबित प्रश्न!

 सभापती काशिनाथ दाते यांनी सोडवला अनेक वर्षापासूनचा प्रलंबित प्रश्न!

५ लक्ष रुपये किमतीच्या औटी वस्ती ते पठार  रस्त्याचे काम मार्गी..




नगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी

मांडवे खुर्द ता पारनेर येथील गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या औटीवस्ती ते पठार रस्ता सुधारणा करणे-५ लक्ष रस्त्याचे काम जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समिती सभापती मा. काशिनाथ दाते सर यांचे शुभहस्ते सुरू झाले यावेळी बोलताना सभापती दाते सर म्हणाले हा रस्ता खडकवाडी परिसरामध्ये येत असल्याने औटी वस्तीतील लोकांना जाण्या-येण्यासाठी फार गैरसोयीचा होता येथील लोकांची जमीन पठारावर असल्याने शेतजमीन करणे करता या लोकांना खडकवाडी वरून पठारावर यावे लागत होते. असे पाच-सात किलोमीटर अंतर वाढायचे फार दिवसापासुन हा रस्ता करून देण्याची मागणी होती मी माझ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये हा रस्ता करून देण्याची आश्वासन येथील वस्तीतील लोकांना दिलेले होते आणि आज त्याचे प्रत्यक्ष काम सुरू करताना निश्चित समाधान वाटत आहे समवेत सरपंच सोमनाथ आहेर, उपसरपंच सौ रेश्मा गागरे, ग्राम. सदस्य गौतम बागुल, रावसाहेब पाटील गागरे ,श्रीरंग पाटील, भाऊसाहेब मॅनेजर ,बाळासाहेब औटी,  सुनील गागरे, नामदेव गागरे ,तुकाराम बागुल, सुरेश औटी, भास्कर औटी,कृष्णा औटी,  भाऊसाहेब दामू गागरे, सिताराम औटी, ज्ञानदेव औटी इ. मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment