*एक तप राज्यातील क्रमांक एकचे विकास अधिकारी म्हणून गौरविलेले शिवाजी मोरे सेवानिवृत्त - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 2, 2021

*एक तप राज्यातील क्रमांक एकचे विकास अधिकारी म्हणून गौरविलेले शिवाजी मोरे सेवानिवृत्त

 एक तप राज्यातील क्रमांक एकचे विकास अधिकारी म्हणून गौरविलेले शिवाजी मोरे सेवानिवृत्त


आष्टी -
आष्टी तालुक्यातील रहिवासी असलेले शिवाजी मोरे हे युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीचे डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून सोमवारी अहमदनगर येथे सेवानिवृत्त झाले.शिवाजी मोरे हे मूळ दौलावडगाव तालुका आष्टी येथील रहिवासी असून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी स्वतःचे शिक्षण घेऊन युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी या विमा कंपनीमध्ये विकास अधिकारी म्हणून काम केले.३४ वर्षे काम केलेल्या त्यांच्या कार्यकालात गेली १२ वर्ष मोरे हे राज्यातील क्रमांक एकचे विकास अधिकारी म्हणून त्यांना गौरवण्यात आले आहे.शिवाजी
 मोरे यांनी ग्रामीण भागातील शेतकरी,शेतमजूर,दूध उत्पादक
,उद्योजक,लघु उद्योजक,
व्यापारी यांच्यासाठी अनेक उपक्रम राबवून विमा योजनेद्वारे अनेकांना मोठा आधार दिला आहे त्यांच्या दिलदार आणि मनमिळावू स्वभावामुळे आणि व्यवसाय विषयी निष्ठा तसेच कठोर परिश्रम यामुळे ते संपूर्ण महाराष्ट्रात परिचित होते.
त्यांच्या कारकिर्दीमध्ये मध्यंतरी सन २०१० मध्ये ऊस तोडणी कामगारांचे लोकप्रभा स्व. गोपीनाथ मुंडे आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची एकत्रित बैठक करून ऊस तोडणी कामगारांना विमा संरक्षण देण्यासाठी साखर संघाचे माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व साखर कारखान्यांवरील व तोडणी कामगार बैलगाडी यांना विमा संरक्षण देण्यात आले होते.हीच योजना आजही सुरु आहे. त्यामुळे या योजनेच्या कार्यालयांमध्ये शिवाजी मोरे यांचा मोठा वाटा होता असे हे कार्यकुशल कर्तव्यदक्ष असे विकास अधिकारी ३१ मे रोजी सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत.त्यांच्या कार्याची दखल घेऊन आणि कामाची तत्परता लक्षात घेऊन परिश्रम लक्षात घेऊन त्यांना युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीने आणखी ७ वर्ष विकास अधिकारी म्हणून काम करण्याची विनंती केली आहे.विशेष म्हणजे त्यांनी ती स्वीकारलेली आहे.शिवाजी मोरे यांचे माजी मंत्री तथा आ.
सुरेश धस,आ.बाळासाहेब आजबे,माजी आ.भीमसेन धोंडे,माजी आ.साहेबराव दरेकर आदिंनी अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment