जेऊर येथील ‘त्या’महिलेचा बंदोबस्त करण्याची मागणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, June 1, 2021

जेऊर येथील ‘त्या’महिलेचा बंदोबस्त करण्याची मागणी

 जेऊर येथील ‘त्या’महिलेचा बंदोबस्त करण्याची मागणी

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः जेऊर (ता. नगर ) येथील  लिफ्ट मागून लुटणार्‍या महिलेचा बंदोबस्त करण्याची मागणी जेऊर ग्रामस्थांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनात म्हटले आहे की, ही महिला नगर औरंगाबाद महामार्ग, सोलापूर रोड, जामखेड रोड तसेच नगर शहरात फिरत असते.
वाहनचालकांना लिफ्ट मागून अंतर गेल्यावर ही महिला स्वतःला अधिकारी असल्याचे सांगते. तसेच वाहन चालकांना लुटते. एखाद्या चालकाने पैसे देण्यास नकार दिल्यास आरडाओरडा करून खोटी केस दाखल करण्याची धमकी देते. लुटले गेल्या नंतरही खोटी केस दाखल करण्याच्या भीतीने तिच्या विरोधात कोणी तक्रार दाखल करत नाही. त्यामुळे तीचे धाडस दिवसेंदिवस वाढत चालले आहे. या अगोदरही जेऊरच्या काही नागरिकांवर केस दाखल करण्याचे प्रकार तिच्याकडून घडले असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. निवेदनावर उपसरपंच श्रीतेश पवार, ग्रामपंचायत सदस्य गणेश तवले, माजी उपसरपंच बंडू पवार, पप्पू ससे,  साहिल शेख यासह ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here