कोरोनाच्या संकटकाळात सामाजिक उपक्रमांची आवश्यकता ः पै. दातरंगे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 2, 2021

कोरोनाच्या संकटकाळात सामाजिक उपक्रमांची आवश्यकता ः पै. दातरंगे

 कोरोनाच्या संकटकाळात सामाजिक उपक्रमांची आवश्यकता ः पै. दातरंगे

सातपुते तालीम मित्र मंडळाच्यावतीने अरुणोदय गो शाळेस चारा वाटप


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः कोरोनाच्या टाळेबंदीत जनावरांच्या चार्याचा प्रश्न गंभीर बनला असताना सातपुते तालीम मित्र मंडळाच्या वतीने अरुणोदय गो शाळेस चारा वाटप करण्यात आले. नगरसेवक पै.सुभाष लोंढे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून इतर खर्चांना फाटा देत हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
अरुणोदय गो शाळेस चारा, वालिस, चरकीपेंढ, घास, ऊस आदी खाद्य जनावरांसाठी देण्यात आले. यावेळी पै.अतुल दातरंगे, पै.सोमेश अकोलकर, योगेश चौधरी, पै. अक्षय दातरंगे, सचिन क्षीरसागर, भैय्या घावटे, आदित्य हावरे, गौरव म्याना आदी उपस्थित होते.
पै.अतुल दातरंगे म्हणाले की, सध्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या संकटकाळात वाढदिवस साजरा न करता त्या पैश्यातून जनावरांसाठी चारा उपलब्ध करुन देण्याचा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. कोरोनाच्या संकटकाळात सामाजिक उपक्रमांची आवश्यकता असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment