ग्रामपंचायत सदस्यांचे अपहरणकर्त्यांचा अटकपुर्व जामीन फेटाळला..... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, June 3, 2021

ग्रामपंचायत सदस्यांचे अपहरणकर्त्यांचा अटकपुर्व जामीन फेटाळला.....

ग्रामपंचायत  सदस्यांचे अपहरणकर्त्यांचा अटकपुर्व  जामीन फेटाळला..... 

गुन्हा गंभीर असल्याचे न्यायालयाचे निरीक्षण   


नगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी

निघोज ता पारनेर येथील सरपंच पदाच्या निवडी अगोदर दोघा नवनिर्वाचीत ग्रामपंचायत सदस्यांच्या अपहरण प्रकरणीतील सर्व आरोपींचा अटकपुर्व जामीन खेड न्यायालयाने फेटाळला आहे. यापुर्वी या आरोपींना तात्पुरता जामीन देण्यात आलेला होता.पारनेर तालूक्यातील सर्वात मोठी व बहूचर्चित अशी निघोज ग्रामपंचायतची दि. ०९/०२/२१ रोजी सरपंच पदाची निवडणूक असताना दोन ग्रामपंचायत सदस्य  दिगंबर भागाजी लाळगे व गणेश कवाद यांना मतदानाच्या दोन दिवसआधी गावातीलच विरोधी गटातील गुंड प्रवृतीच्या साधारण २० ते २५ जनांच्या टोळक्याने  दोघांचे खेड परीसरातून शस्त्रांचा धाक दाखवून अपहरण केले होते. व त्यांना भारतीय राज्यघटनेने दिलेल्या मतदानाच्या हक्कापासून वंचित ठेवून गैरमार्गाने निघोज ग्रामपंचायतीचा ताबा घेवून एकअर्थाने लोकशाहीचा गळा आवळून काळीमा फासवणारी कृती केली होती. याबाबत  खेड पोलिसांनी विठ्ठल कवाद यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला होता. गैरकारदेशीर लोकांकडून शस्त्राचा धाक दाखवून मारहान करून दोघाजनांचे अपहरण केले होते .  यातील अपहरण करण्यात आलेल्या दिगंबर लाळगे व गणेश कवाद यांनी सुटकेनंतर  खेड पोलीसांना त्यांचेसोबत झालेल्या गैरकृत्याचे सत्य कथन करून जबाब दिला होता. खेड पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनूसार निघोज ग्रामपंचातीचे सदस्य सचिन वराळ, मंगेश वराळ यांनी अटकेच्या भितीपोटी अटकपूर्व जामीनासाठी खेड न्यायालयात धाव घेतली होती, त्यांनंतर त्यांना तात्पुरता जामीन मंजूर झाला होता. दोन दिवसांपुर्वी खेड  न्यायालयाने त्यांचा जामीन कायम करण्यास नकार दिला.आरोपींनी केलेले कृत्य अतिषय

गंभीर स्वरूपाचे आहे. व गुह्याच्याा पुढील  तपासासाठी   आरोपींच्या पोलिस कोठडीडीची  गरज असल्याने,आरोपींचा जामीन नामंजूर करत असल्याचा निकाल देण्यात आला. विठ्ठल कवाद यांनी दिलेल्या फिर्यादी मध्ये आरोपी सुनिल वराळ,निलेश घोडे, अजय वराळ,धोंडीबा  जाधव,राहूल वराळ व इतर १५ आरोपी  आहेत.  

    आरोपींच्या बाजूने हजर झालेले अँड  ठानगे यांनी या प्रकरणात आरोपींना खोट्या पद्धतीने राजकीय द्वेशातुन गुंतवल्याचा युक्तीवाद करण्यात आला.  सरपंच निवडीच्या कागदपत्रांवरून गुह्यातील मुख्य आरोपी  व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सचिन वराळ याच्या पत्नीची सध्या  सरपंच पदी निवड झालेली असल्याने, आरोपींचा या गुह्यात सहभाग असण्याची शक्यता असल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले. त्यामुळे यातील सर्व आरोपींना तपासासाठी पोलीसांनी ताब्यात घेवून गुन्हा करतेवेळी वापरलेली वाहने, हत्यारे व ईतर मुद्देमाल ताब्यात घेण्याचा आदेश दिला. 

[ आरोपींना ताब्यात घेवून आम्ही दिलेल्या जबाबानुसार पोलिसांनी तपास केल्यास सत्य बाहेर येईल.दिगंबर लाळगेगणेश कवाद ग्रा. सदस्य निघोज ]

No comments:

Post a Comment