अहमदनगर महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन साजरा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 8, 2021

अहमदनगर महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन साजरा

 अहमदनगर महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन साजरा

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः  5 जून जागतिक पर्यावरण दिन-2021, पर्यावरणा विषयी जाणून घेऊन जागृतीचा जागर घालण्याचा दिवस,  पर्यावरणाप्रती संवेदनशील होण्याचा दिवस आणि मानव जातीच्या भविष्याविषयी विचार करण्याचा दिवस, कारण आपण सर्व या पर्यावरणाचा एक भाग आहोत. आपण अनेक पर्यावरणीय समस्यां अनुभवतो आहोत. ज्या पर्यावरणातील मानवी हस्तक्षेपामुळे निर्माण झालेल्या आहेत. त्याचे उत्तरहि मानवासच शोधावे लागतील. त्या अनुषंगाने विद्यर्थ्यान मध्ये पर्यावरणाप्रती जागरूकता, संवेदनशीलता आणि उपक्रमशीलता निर्माण व्हावी त्या साठी अहमदनगर कॉलेज एनसीसी युनिट ने जागतिक पर्यावरण दिन नाविन्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा केला.
याचा एक महत्वाचा उपक्रम म्हणून सोमवार दिनांक 7 जुने रोजी वेबिनारचे आयोजन केले होते. या ऑनलाईन व्याख्यानाचा विषय होता इकॉलाँजिकल बटालियन आणि वनीकरण. या कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते होते टेरीटोरिअल आर्मी, इकॉलाँजीकाल बटालियन, औरंगाबादचे  कमांडिंग ऑफिसर कर्नल वेंकटेश आणि प्रकल्प समन्वयक कर्नल भटनागर, कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कॉलेजचे प्राचार्य डॉ.आर.जे बर्नबस हे उपस्थित होते. या प्रसंगी प्राचार्य डॉ आर. जे. बर्नबस यांनी कॉलेजच्या विविध उपक्रमा विषयी माहिती देत पमुख वक्त्यांचे स्वागत केले आणि एनसीसी युनिटचे कौतुक केले.
या प्रसंगी प्रथम सत्रात  इकॉलाँजिकल बटालियन प्रकल्प  समन्वयक कर्नल भटनागर यांनी टेरीटोरिअल आर्मी, इकॉलाँजिकल बटालियनचा  इतिहास व उद्देश, बटालियन संख्या, प्रमुख केंद्र  वनीकरण प्रकल्पा विषयी महिती दिली. दुसर्‍या सत्रात इकॉलाँजिकल बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल वेंकटेश यांनी या बटालियनच्या द्वारे वनीकरणाचे प्रत्यक्ष कार्य कसे चालते या विषयी शास्त्रीय व सखोल माहिती दिली. भौगोलिक प्रदेश, हवाना, मृदा इ. घटकांचा विचार करून स्थानिक वृक्षांची निवड काशी केली जाते, बियांची निवड, साठवण, आणि रोपणी या सर्व घटकान विषयी विस्तृत विवेचन केले. सध्या मराठवाड या प्रदेशात वनीकरणाचे कार्य मोठ्या प्रमाणत सुरु आहे हे त्यांनी आवर्जून सांगितले. वृक्षरोपण व पर्यावरणाच्या विविध अंगाच्या संवर्धनाचा कसा संबंध आहे हे उदाहरणे देत सोप्या भाषेत समजावले. येणार्‍या पिढ्यांसाठी व शाश्वत भविष्याच्या दृष्टीने विशे करून तुरुनांनी विद्यार्थ्यांनी वृक्षरोपनासाठी स्वयंस्पुर्तीने पुढे येणे काळाची गरज आहे. वनीकरणासाठी सर्व मतभेद, भेदाभेद, राजकारण, धर्मकारण, अर्थकारण असे अनेक करणे बाजूला ठेऊन एका उद्देशाने सर्वांनी एकत्र हि गरज नाही तर अवश्यकत झाली आहे. तिसर्‍या सत्रात दोन्ही वक्त्यांनी एनसीसी छात्रानी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली व सहभागी विद्यार्थी एनसीस छात्र यांच्याशी चर्चा करत संवाद साधला.
कार्यक्रमचे प्रास्ताविक, पाहुण्याची ओळख सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन सहयोगी एनसीसी अधिकारी लेफ्टनंट डॉ. एम.एस. जाधव यांनी केले. या कार्यक्रमात 200 पेक्षा जास्त एनसीस छात्र,विद्यार्थी व इतरांनी सहभाग ननोंदवला आणि इप्रमाणपत्र प्राप्त केले. जागतिक पर्यावरण दिन सेलिब्रेशन चा एक उपक्रम म्हणून एनसीसी छात्रानी पर्यावरण जागृतीपर अने उतम व्हिडीओ बनवले व विविध समाजममाध्यमांवर शेअर केले. 5 जून या दिवशी सहयोगी एनसीसी अधिकारी लेफ्टनंट डॉ. एम.एस. जाधव यांनी ऑनलाईन माध्यमाने अप खपलेर्पींशपळशपीं र्ढीीींह हि जागतिक हवामान बदला संबंधी डॉक्यूमेंट्री  दाखवली आणि चात्रांशी चात्रांशी चर्चा केली.
17 महाराष्ट्र बटालियन चे कमांडिंग ऑफिसर कर्नल जीवन झेंड व कर्नल विनय बाली याचे विशेष आभार, त्यांच्या मुळे वेबिणार साठी लाभलेले दोन्ही वक्त्यांचा व कार्याचा परिचय झाला आणि आमंत्रित करणे शक्य झाले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.गायकर, डॉ.नागवडे, डॉ.रझाक आय.क्यू.ए .सी. समन्वयक डॉ.बेदरकर रजिस्ट्रार अल्हाट, सर्व प्राध्यापक सहकारी यांच्या सहकार्या बद्दल आभार आणि सर्व सहभागी एनसीसी छात्रांचे व विद्यार्थ्यांचे आभार.

No comments:

Post a Comment