आ. संग्राम जगताप यांचा वाढदिवस आरोग्यदायी उपक्रमाने साजरा- गणेश भोसले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, June 12, 2021

आ. संग्राम जगताप यांचा वाढदिवस आरोग्यदायी उपक्रमाने साजरा- गणेश भोसले

 आ. संग्राम जगताप यांचा वाढदिवस आरोग्यदायी उपक्रमाने साजरा- गणेश भोसले

संघर्ष प्रतिष्ठान व संपत बारस्कर यांच्याकडून आ.संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त मनपा कर्मचार्‍यांना मास्क वाटप


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः गेल्या दीड वर्षापासून कोरोना महामारीचे भयंकर संकट आपल्यावर  ओडवले आहे.  त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाला आहे. कोरोनाचा  हा संसर्गजंन विषाणू असल्यामुळे एका व्यक्तीपासून अनेक व्यक्तींना संसर्ग होण्याची भीती मोठ्या प्रमाणात आहे. यासाठी प्रत्येक नागरिकांनी आपआपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. जेणेकरून कोरोणा चा संसर्ग थांबण्यास मदत होईल कोरोनामुळे अनेकांच्या कुटुंबातील व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे या पुढील काळात प्रत्येकाने शासनाचा नियमाचे पालन करावे आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त मनपा विरोधी पक्ष नेता संपत बारस्कर व संघर्ष प्रतिष्ठान च्या वतीने मनपाच्या कर्मचार्‍यांना माक्सचे वाटप करून प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी जोपासत आरोग्यदायी उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करावा  असे अवाहान  ज्येष्ठ नगरसेवक गणेश भोसले यांनी केले.
आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त मनपा कर्मचार्‍यांना संघर्ष प्रतिष्ठान व  विरोधी पक्षनेता संपत बारस्कर यांच्यावतीने मास्क वाटप करताना करताना ज्येष्ठ नगरसेवक गणेश भोसले, स्थायी समितीचे सभापती अविनाश तात्या घुले, आरोग्य समितीचे अध्यक्ष डॉक्टर सागर बोरुडे, नगरसेवक प्रकाश भागानगरे आदी सहा मनपा कर्मचारी उपस्थित होते.
स्थायी समिती सभापती अविनाश घुले म्हणाले की कोरोना च्या संकट काळामध्ये प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी जोपासत आपला वाढदिवस  आरोग्यदायी उपक्रमाने साजरा करावा इतर खर्चाला फाटा देऊन आरोग्याचे उपक्रम राबवावे. आमदार संग्राम जगताप यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा केला जात आहे असे ते म्हणाले
संपत बारस्कर म्हणाले की कोरोना विषाणूचा संसर्ग थांबण्यासाठी माक्सचा वापर होणे गरजेचे आहे यासाठी महापालिका कर्मचार्‍यांना आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त माक्सचे वाटप करण्यात आले मनपा कर्मचारी हे आपला जीव धोक्यात घालून गेलु वर्षभर शहरातील नागरिकांना मूलभूत प्रश्नापासून सुविधा उपलब्ध करून देत आहे व आपली जबाबदारी पार पाडत आहेत काही महापालिका कर्मचार्‍यांचा कोरोना मध्ये दुर्दैवी मृत्यू ही झाला आहे. महापालिका कर्मचार्‍यांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी कोरोणाचा संसर्ग रोखण्यास मदत होईल या दृष्टिकोनातून  मास्क वाटप असे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment