आ.संग्राम जगताप व संपत बारस्कर यांच्या वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 9, 2021

आ.संग्राम जगताप व संपत बारस्कर यांच्या वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

 आ.संग्राम जगताप व संपत बारस्कर यांच्या वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

सण-उत्सव, वाढदिवस साजरे करताना प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी जोपासावी- दाभाडे.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः सण-उत्सव, वाढदिवस साजरे करत असताना प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी जोपासावी सध्या कोरोनाच्या संकट काळामध्ये विविध संस्थांनी पुढे येऊन मदतीचा हात दिला, पाहिजे समाजाप्रती आपले काहीतरी देणे लागते याच भावनेतून सकारात्मक दृष्टिकोनातून पुढे येऊन काम केले पाहिजे. समाजामध्ये अनेक प्रश्न हे प्रलंबित आहे यासाठी युवकांनी संघटन करून आपली सामाजिक जबाबदारी सांभाळावी असे प्रतिपादन स्वराज्य कामगार संघटनेचे उपाध्यक्ष किरण दाभाडे यांनी व्यक्त केले.
स्वराज्य कामगार संघटनेच्या वतीने आ.संग्राम जगताप व विरोधी पक्षनेता संपत बारस्कार यांच्या वाढदिवसानिमित्त एमआयडीसी पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचार्‍यांना कोरोना संकटापासून बचाव होण्यासाठी मास्कचे वाटप करताना अध्यक्ष दत्ता तापकिरे, उपाध्यक्ष किरण दाभाडे, खजिनदार पै.सुनील कदम, बाबासाहेब गायकवाड, किसन तरटे, सतीश गरकळ, अशोक म्हस्के, भाऊ बारस्कर, सुधाकर तामखडे, दिनेश वाघ, गौतम भालेराव आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना भाऊ बारस्कर म्हणाले की, युवा पिढीने एकत्रित येऊन समाजहिताचे काम केले पाहिजे, कोरोनाच्या संकट काळामध्ये पोलिसांनी आपली जबाबदारी सक्षमपणे पार पाडली आहे. अनेक नागरिकांचे जीव वाचवण्यास व नागरिकांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी पोलिसांची महत्त्वाची भूमिका आहे.या संकट काळामध्ये काही पोलिसांचा दुर्दैवी मृत्यू झाला तरी सुद्धा पोलिसांनी रात्रंदिवस पहारा दिला यासाठी स्वराज्य कामगार संघटनेच्यावतीने एमआयडीसी येथील अधिकारी व कर्मचार्‍यांना मास्कचे वाटप करण्यात असे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment