रोटरीच्या सहभागाने अंध नागरिकांसाठी नगरमध्ये लवकरच वृद्धाश्रम - डॉ. प्रकाश कांकरिया - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, June 15, 2021

रोटरीच्या सहभागाने अंध नागरिकांसाठी नगरमध्ये लवकरच वृद्धाश्रम - डॉ. प्रकाश कांकरिया

 रोटरीच्या सहभागाने अंध नागरिकांसाठी नगरमध्ये लवकरच वृद्धाश्रम - डॉ. प्रकाश कांकरिया


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः रोटरी निवारा ही वसाहत रोटरी क्लबचा परिवार आहे. या परिवाराच्या सदस्यांनी प्रेमाचा व आपुलकीचा हात पाठीवर ठेवत केलेला सन्मान हा आनंद देणारा आहे. दिव्यांगासाठी रोटरी निवारा उभारल्यानंतर आता लवकरच रोटरीच्या सहभागाने अंध नागरिकांसाठी वृद्धाश्रम सुरु करणार आहोत. पावसाळा सुरु झाल्याने या वसाहती मधील सर्व घरांचे नूतनीकरणा चे काम रोटरी क्लब हाती घेत आहे. जागतिक दृष्टिदान दिनानिमित्त सर्व नागरिकांनी नेत्र दानाचा संकल्प करावा. आता लवकरच जगात डोळ्यात सीसीटीव्ही कॅमेरा सारखी वस्तू बसवून पूर्ण अंध असलेल्यांना दृष्टी देणारे तंत्रज्ञान येणार आहे. नगरमध्ये हे तंत्रज्ञान आणणार आहे, असे प्रतिपादन डॉ. प्रकाश कांकरिया यांनी केले.
नुकत्याच झालेल्या जागतिक दृष्टिदान दिनानिमित्त रोटरी क्लब अहमदनगरच्या वतीने क्लबचे माजी अध्यक्ष डॉ.प्रकाश कांकरिया यांना अमेरिका येथील फोबर्स संस्थेचा अंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्या बद्दल एमआयडीसी मधील दिव्यांग नागरिकांच्या रोटरी निवारा येथे दिव्यदृष्टी दिव्यांग विकास संस्थेच्या वतीने डॉ.प्रकाश कांकरिया यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. यावेळी रोटरी क्लब अहमदनगरचे अध्यक्ष अ‍ॅड. अमित बोरकर, सचिव पुरुषोत्तम जाधव, डॉ.सुधा कांकरिया, अंधसेवा मंडळाचे जेष्ठ सभासद संभाजी भोर, राष्ट्रीय दृष्टिहीन संघाचे राज्याचे सचिव प्रदीप लोंढे, जिल्हा सचिव श्रीकांत माचवे, अमोल चव्हाण, कृष्णा तवले, गोरख दरंदले आदी उपस्थित होते.
यावेळी अ‍ॅड. अमित बोरकर, डॉ.प्रकाश कांकरिया यांच्या सारखे आदर्श व्यक्तिमत्व अहमदनगर रोटरी क्लबचे मार्गदर्शक असल्याचा मोठा अभिमान आम्हला आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली रोटरीचे सामाजिक कार्य चालू आहे. प्रास्ताविकात पुरुषोत्तम जाधव म्हणाले, डॉ. प्रकाश कांकरिया यांच्या कार्याची दखल घेत नगर सारख्या छोट्या शहरात अमेरिका येथील मोठ्या संस्थेने अंतरराष्ट्रीय पुरस्कार यांना देणे ही अभिमानास्पद घटना आहे, असे सांगितले, यावेळी संभाजी भोर, गोरख दरंदले यांचे अभिनंदनपर भाषणे झाली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here